Pune News, 27 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात येत आहेत. उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी असून महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीमध्ये बंडखोरीच्या शक्यता बळवल्या आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघ (Parvati Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून शनिवारी (ता.26) दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम (Ashwini Kadam) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले आबा बागुल हे नाराज झाले असून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
बागुल (Aba Bagul) यांच्याकडून मतदारसंघांमध्ये बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे मत या बैठकांच्या माध्यमातून जाणून घेतलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची डोकेदुखी लाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील आबा बागुल यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना उमेदवारी नाकारली गेली. त्यावेळी बंडाच्या तयारीत असलेल्या बागुल यांची समजूत काढण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना यश आलं होतं. आता पुन्हा एकदा आबा बागुल यांनी बंडाच निशाण फडकवलं असून यावेळी काँग्रेस (Congress) नेते त्यांचे बंड शमवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान आतापर्यंत काँग्रेसकडून तीन उमेदवार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या तिन्ही याद्यांमध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. या ठिकाणी देखील उमेदवार घोषित केल्यानंतर बंडखोरीची शक्यता आहे.
त्यामुळेच काँग्रेसकडून उमेदवांरचं नाव घोषित करण्यात उशीर करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघांमध्ये देखील काँग्रेसकडून बंड अटळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पुण्यातील बंडाळी मोडीत काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.