PCMC News: राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. परंतु आठ दिवसांपूर्वी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात वेगळेचं चित्र पाहायला मिळत होतं. या तीनही मतदारसंघात बंडखोरीमुळे बहुरंगी लढती होतील असं वाटत असतानाच बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
चिंचवड, भोसरी मतदारसंघात भाजप आणि पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर या तीनही मतदारसंघात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही मतदारसंघात बंडखोरी होऊन बहुरंगी लढती होतील असे चित्र असताना बंडखोरांचे मन वळविण्यात संबंधित पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे तिहेरी होणारी ही निवडणूक दुरंगी लढतीवर येऊन पोहोचली आहे.
चिंचवड विधानसभेत महायुतीतील भाजपचे उमेदवार शंकर जगताप निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात लढत होणार आहे. जगताप कुटुंबाकडून नेहमीच चिंचवडच्या विकासाचा दावा केला जातो. त्यामुळे राहुल कलाटे जगताप यांच्याविरोधात भ्रष्टाचार व प्रलंबित प्रश्न हे मुद्दे घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे चिंचवडचा आमदार कोण होतयं हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पिंपरी विधानसभेत (Pimpri Vidhansabha) रिंगणात असणारे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. तर 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा धर-शिलवंत यांच्यात लढत होणार आहे.
तर भोसरी विधानसभेत महायुतीमधील भाजपचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landage) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात लढत होत आहे. लांडगे विद्यमान आमदार असून मागील दहा वर्षापासून केलेली विकास कामे ते मांडत आहेत. आमदार म्हणून सर्वाधिक प्रकल्प मार्गी लावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेच. त्यांच्या विरोधात उभे असणारे अजित गव्हाणे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. लांडगे आणि गव्हाणे हे मुळचे भोसरीचे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. आता या वेळेस लांडगे हॅट्रिक साधणार की त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.