Prakash Ambedkar : मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'घरंदाज मराठा...'

Prakash Ambedkar Criticized manoj jarange patil : मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकते. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Manoj jarange patil Prakash ambedkar
manoj jarange patil prakash ambedkarsarkarnama
Published on
Updated on

सागर आव्हाड

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीने आपला जाहीरनामा आज (मंगळवारी) प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला, असा दावा आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे प्रत्येक जिल्ह्यात काकाला मतदान दिलं काय अन् पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळे एक खुणगाठ बांधून यातील किती लायक अन् किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचे नाही, हे जरांगेंनी जाहीर करायला हवं.

विधानसभा निवडणुकीतील जरांगे पाटील रोल संपला असं आम्ही मानत नाही. 70 टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आल्या आहेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकते. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. ओबीसी समाज वंचितकडे वळाला आहे, असा आमचा दावा आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढतोय, त्यामुळं हा वर्ग आमच्यासोबत येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Manoj jarange patil Prakash ambedkar
Eknath Shinde and Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीसाठी...' ; एकनाथ शिंदेंचं कोरेगावमधील प्रचारसभेत मोठं विधान!

सत्तेत सहभागी होणार

आमचे 15 आमदार निवडून आले तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू. मग सोयाबीन आणि कापूसला योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्याची लोकसंख्या 13 कोटीच्या घरात आहे, त्यामुळे आता दोन लाख रोजगार निर्मितीची गरज आहे. उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा. तेंव्हा घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असे देखील आंबेडकर म्हणाले.

9 नोव्हेंबर आंबेडकरांच्या सभा

प्रकाश आंबेडकर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रीया करण्यात आली. डाॅक्टरांच्या सल्ल्याने ते विश्रांती घेत आहेत. मात्र, 9 नोव्हेंबरला सोलापूर येथून त्यांच्या सभांना सुरुवात होईल. आंबेडकर म्हणाले, माझ्या तब्येतीबाबत बऱ्यावाईट प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी प्रचार करेन.

Manoj jarange patil Prakash ambedkar
Shahu Maharaj News : 'कोल्हापूर उत्तर'मध्ये मोठा ट्विस्ट; खासदार शाहू महाराजांची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com