Sanjay Raut : पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना पेलणार का?

Assembly Elections : आघाडीत ठाकरे शिवसेनेकडे नव्या राजकीय घडामो़डीनंतर आवाहन दिसत नाही.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना अॅक्शन मोडवर आली आहे. राज्यातील संघटनात्मक बांधणीची विभागवार जबाबदारी त्यांनी आपल्या दहा नेत्यांवर सोमवारी सोपविली. त्यात पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा आणि पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांना देण्यात आली आहे.

पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करून दाखविण्याचे आणि फुटीनंतर पक्ष नव्याने पुन्हा उभा करण्याचे मोठे आवाहन आता या आक्रमक नेत्यासमोर उभे ठाकले आहे. ते राऊत पेलणार का, अशी चर्चा त्यांच्यावरील या नव्या जबाबदारीनंतर उद्योगनगरीत व त्यातही पिंपरीत सुरू झाली आहे.

राज्यसभा सदस्य असलेल्या राऊतांना पुणे जिल्ह्याची व तेथील वरील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली असली, तरी २०२४ च्या लोकसभेला त्यांना तेथे फायदा होणार नाही, असे दिसते कारण तेथे त्यांचा खासदार होणे सद्यःस्थिती पाहता अवघड आहे. मात्र, ते सामील असलेल्या आघाडीच्या उमेदवाराला राऊतांसारख्या फायरब्रँड नेत्याचा आणि त्यांच्या पक्षाचा फायदा होऊ शकतो.

लोकसभा नाही, पण विधानसभेला राऊत आणि शिवसेनेच्या संघटना बांधणीची मदत होऊ शकते, कारण शिवसेना एकसंध असताना २०१४ ला उद्योगनगरीत पिंपरी राखीव मतदारसंघात शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार आमदार होते. तेथे पक्ष दुभंगल्यानंतरही पुन्हा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना आता पेलायचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Mahesh Landge : बारा वर्षे राष्ट्रवादीत घुसमट; महेश लांडगेंच्या राजकीय जीवनात ‘हा’ ठरला ‘टर्निंग पॉइंट’

पुणे जिल्ह्यात फक्त मावळमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, पण ते शिंदे शिवसेनेत गेले आहेत. इतर मतदारसंघात पुन्हा खासदार होईल एवढी ताकद आता ठाकरे शिवसेनेत ती फुटल्यानंतर राहिलेली नाही. त्यांचे शिरूरचे माजी खासदार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील हेही बारणेप्रमाणे शिंदे शिवसेनेत गेले आहेत. तेसुद्धा पुन्हा शिंदे शिवसेनेकडून शिरूरमध्ये इच्छुक आहेत.

ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) आपल्याकडे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, ते आढळराव यांना उमेदवारी देणार असल्याचे समजते. बारामती आणि पुण्याची जागा वाटपात आघाडीत ठाकरे शिवसेनेकडे नव्या राजकीय घडामो़डीनंतर दिसत नाही, पण तेथील पक्षबांधणीचा फायदा आघा़डीच्या उमेदवाराला होणार आहे.

संघटना बांधणी पुन्हा नव्याने करावी लागणार...

गेल्या वर्षी शिवसेना, तर यावर्षी राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे आघाडीतील या दोन्ही पक्षांची ताकद निम्म्याने घटली. त्यांचे फुटलेले गट भाजपला जाऊन मिळाल्याने त्यांची ताकद लोकसभेला दुपटीने वाढली गेली. परिणामी फुटीच्या या अडचणीच्या काळात आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना या दोघांनाही एकमेकांच्या मदतीची गरज आहे.

त्यात उद्योगनगरीत कॉंग्रेससारखीच शिवसेनेची अवस्था आता ती फुटल्यानंतर अगदी तोळामासा झाली आहे. खासदार व बहुतांश पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने संघटना बांधणी राऊतांना पु्न्हा नव्याने करावी लागणार आहे. हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Sanjay Raut
Mahesh Landge : बारा वर्षे राष्ट्रवादीत घुसमट; महेश लांडगेंच्या राजकीय जीवनात ‘हा’ ठरला ‘टर्निंग पॉइंट’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com