पोलिसांवर टीका : नास्तिकांचा मेळावा रद्द करायला लावला; भावना दुखावत असल्याचा आक्षेप

पुण्यात (Pune) रामनवमीच्या दिवशी हा मेळावा होणार होता.
नास्तिक मेळावा
नास्तिक मेळावाSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे : कोरोना काळानंतर भरणारा पहिला नास्तिक मंडळींचा (Atheists rally in Pune) पुण्यातील मेळावा काही मंडळींच्या आक्षेपामुळे रद्द करण्यात आला. पुण्यातील एस. एम. जोशी (10 एप्रिल रोजी) सभागृहात हा मेळावा होणार होता. मात्र या दिवशी रामनवमी आहे आणि आमच्या भावना दुखावण्यासाठी मुद्दाम हा दिवस निवडण्यात आल्याचा आरोप या मेळाव्यावर काही मंडळींनी केला.

या आक्षेपामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) मेळाव्याच्या आयोजकांना तो रद्द करण्यासाठी आग्रह केला. बराच वेळ याबाबत चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांवर वाढता ताण घेता हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला. महाराष्ट्रातील अनेक मंडळी यासाठी येणार होती. मात्र ते येथे पोहोचण्याच्या आधीच मेळावा रद्द झाल्याने त्यांनाही प्रवासाचा भुर्दंड बसला आहे. मात्र हा मेळावा रद्द झाल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू झाली आहे. नावात फक्त फुले-शाहू आंबेडकर, अशी नावे घ्यायची आणि प्रबोधनाचे कार्यक्रम बंद पाडायचा, असा सूर या निमित्ताने काहींनी लावला आहे. यातील काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :

भगतसिंग विचारमंच दरवर्षी नास्तिकांचा मेळावा पुण्यात आयोजित करत असतो. सर्वात पहिला मेळावा भगत सिंग स्मृती दिवसानिमित्त २३ मार्च २०१४ मध्ये झाला होता. ज्याचे अध्यक्षपद डॉ श्रीराम लागू यांनी भूषवले होते. त्यानंतर पुढील सहा वर्षे अनेक दिग्गज वक्त्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे . मागील दोन वर्षात कोरोनामुळे मेळावा घेता आला नाही. मात्र यावर्षी मेळावा मोठ्या धामधुमीत करण्याचे नियोजन होते. यावर्षी शरद बाविस्कर आणि तुकाराम सोनावणे हे वक्ते म्हणून येणारे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुग्धा कर्णिक असणार होत्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत य ना वालावलकर यांच्या विवेकी विचार या पुस्तिकेचे प्रकाशन होणार होते. आता हे सारे पुढे गेले आहे. या मेळाव्याला केवळ नास्तिकांसाठीच प्रवेश होता. यासाठीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com