ATS Action In Pune : केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंटस ....' पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे बॉम्ब बनवण्याचे साहित्य 'एटीएस'कडून जप्त

Marathi news : आरोपींनी पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली एक दुचाकीही एटीएसने जप्त केली आहेत.
ATS Action In Pune : केमिकल पावडर, लॅब  इक्विपमेंटस ....'  पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे बॉम्ब बनवण्याचे साहित्य 'एटीएस'कडून जप्त
Published on
Updated on

ATS Action In Pune : महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अदनान अली सरकार याचा साथीदार झुल्फिकार बडोदावालाने आपल्या साथीदारांसाठी बॉम्ब बनवण्याचे शिबीर आयोजित केले होते. पूरून ठेवण्यात आले ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केलं आहे. कोथरूडमध्ये पकडण्यात आलेल्या त्या दोन दहशतवाद्यांच्या मदतीने इतर साथीदारांसाठी हे शिबीर आयोजित केल्याची माहिती उघड झाली आहे.

दोन्ही दहशतवाद्यांनी वापरलेले एक चारचाकी, दोन पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसेही एटीएसने जप्त केली आहेत. एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. तसेच, पकडलेल्या दहशतवाद्यांच्या फरार साथीदाराचा आणि त्यांना मदत करणाऱ्यांचाही एटीएस तपास करत आहेत.

ATS Action In Pune : केमिकल पावडर, लॅब  इक्विपमेंटस ....'  पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे बॉम्ब बनवण्याचे साहित्य 'एटीएस'कडून जप्त
Pune ATS News: झुल्फिकार बडोदावालाकडून मिळत होती पुण्यातील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद

बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विविध केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्युपमेन्टस, थर्मामिटर, पिपेट. याशिवाय आरोपींनी पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली एक दुचाकीही एटीएसने जप्त केली आहे. दहशतवादी (Terrorist ) हे स्वत:ला ग्राफिक डिझायनर असल्याचे भासवत होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांचे बारावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही. तरीही ते प्रशिक्षित दहशतवादी असून, त्यांनी बॉम्ब तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे.

पुण्यात दोघांना अटक केल्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी काहीजणांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे. तसेच, दहशतवाद्यांनी ड्रोनमधून केलेले चित्रीकरणही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात अनेक महत्त्वाचे धागेदोरे आम्हाला सापडतील, असं ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com