बारामती : बारामती (Baramati) नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी पर्यवेक्षक व कर्मचारी यांच्यातील कथित अश्लिल संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाल्याने बारामतीत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Audio clip of obscene conversation in Baramati goes viral again)
बारामती नगरपालिकेच्या स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या कंपनीतील एक पर्यवेक्षक त्याच्या एका कर्मचाऱ्याशी बोलताना स्वच्छतेसाठी येणाऱ्या विशिष्ट महिलांबाबत अश्लिल संभाषण करत संबंधित महिलेकडून शरीरसुखाची अपेक्षा थेटपणे करताना स्पष्ट होत आहे.
या संभाषणातील काही शब्द अत्यंत खालच्या पातळीवरील असून या दोन्ही कर्मचाऱ्यांची भाषा ही महिलांच्या दृष्टीने लज्जास्पद अशीच आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपबाबतची माहिती व्हायरल झाल्यानंतर नगरपालिकचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची बंदी केली आहे. मुख्य कंत्राटदाराकडून या बाबतचा खुलासा मागविण्यात आलेला आहे.
या संभाषणामध्ये काही महिलांची नावेही संबंधितांनी घेतली आहेत. त्यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीत हे दोघेही बोलत असून या दोघांवरही कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महिलांविषयी जर कंत्राटदाराकडील पुरुष कर्मचारी विचार करत असतील, तर महिलांसाठी हे काम खरंच कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.