डॉ. राहुल गेठे बहुत उड रहा है... : मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली हेाती.
Rahul Gete
Rahul GeteSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठोपाठ त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) डॉ. राहुल गेठे यांनाही नक्षलवाद्यांकडून (Naxalites) जीवे मारण्याची धमकी आली आहे. शिंदे हे युती सरकारच्या काळात गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री (Guardian Minister) असताना डॉ. गेठे यांनी या भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात कामे केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर त्यांचे ओएसडी डॉ. गेठे यांना धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Naxalites threatened to kill Dr. Rahul Gethe)

नक्षलवाद्यांनी एक पत्र लिहून डॉ गेठे यांना धमकी दिली आहे. लाल शाईने लिहिलेले पत्र आल्यानंतर राज्यातील तपास यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्धा डझन ओएसडीपैकी डॉ. राहुल गेठे हे एक आहेत. ते पूर्णवेळ मुख्यमंत्री शिंदेसोबत राहतात. त्याआधी युती सरकारच्या काळात शिंदे यांच्याकडे गडचिरोली आणि ठाण्याच्या पालकमंत्रिपद हेाते. गडचिरोलीत आरोग्य आणि शिक्षणाच्या योजना राबविण्यातही डॉ. राहुल गेठे यांचाच पुढाकार होता.

Rahul Gete
'राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याची एवढी काळजी का?'

पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आखलेली विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी डॉ. राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून गेठे यांच्या कामात अडथळे आणण्याचे काम केले होते. विकास कामे न करण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गडचिरोली विकास कामे करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी गडचिरोलीत जाऊन दिवाळी साजरी केली होती. त्यामुळे शिंदेपाठोपाठ डॉ. गेठे यांनाही नक्षलवाद्यांनी टार्गेट केल्याचे बोलले जात आहे.

Rahul Gete
बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक; रवी राणांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ

नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी यांना पाठविलेल्या पत्रातील मजूकर

जय लाल सलाम

जय किसान

डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी.....

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com