NCP Politics : आझमभाईंची घरवापसी वाढवणार अजित पवारांची डोकेदुखी

Pune Politics : अजितदादांमुळे दुखावलेल्या आणखी काही जणांची येत्या काही दिवसांत घरवापसी होणार आहे
NCP Politics :
NCP Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Politics : शहराच्या राजकारणात दबदबा असणारे एक बडे प्रस्थ आझमभाई पानसरे यांची घरवापसी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता पिंपरी- चिंचवडमध्ये मोठी वाढली आहे. त्यामुळे विधानसभेला शहरातील तीनपैकी पिंपरी राखीव या मतदारसंघात मोठा फेरफार होणार आहे. तेथील अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे टेन्शन, तर शरद पवार गटाचा आमदार तेथे होण्याचे चान्सेस आता वाढले आहेत.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाची उद्योगनगरीची जबाबदारी सोपविलेले युवा आमदार रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या शहर दौऱ्यात गणेशोत्सवात (२३ सप्टेंबर) आझमभाईंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आझमभाईंच्या आजच्या पाठिंब्य़ाची बीजे त्या भेटीतच रोवली गेली होती. कारण त्यावेळी आ. रोहित यांची भाईशी बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर तरुण शहराध्यक्ष तुषार कामठे आणि त्यांचे सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ हे सहकारी आझमभाईंच्या सातत्याने संपर्कात होते. आता त्यांच्या पाठिंब्याने अजित पवार गटाची शहरात चिंता वाढणार, यात शंका नाही.

NCP Politics :
Bharat Gogawale On Thackeray : ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का ? गोगावले म्हणतात, "राजकारणात काहीही घडू शकतं..."

आझमभाईनंतर त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांचीही घरवापसी?

आझमभाई यांना मानणारा मोठा वर्ग शहरात अल्पसंख्याक नाही, तर बहुसंख्याकांतही आहे. गत टर्ममध्ये त्यांच्या विचाराचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या या समर्थकांचीही येत्या काही दिवसांत घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. पवारसाहेबांचे कट्टर समर्थक असलेले आझमभाई हे अजितदादांनी बेदखल केल्यामुळे भाजपमध्ये गेले होते.

अजितदादांमुळे दुखावलेल्या आणखी काही जणांची येत्या काही दिवसांत घरवापसी होणार आहे, असे शरद पवार गोटातून सांगण्यात आले. पवारसाहेबांच्या धोरणी निर्णयाने पिंपरी -चिंचवड मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. यामुळेच मी त्यांच्यासोबत आलो आहे, अशी प्रतिक्रिया आझमभाईंनी दिली. आता कामठेंसोबत भाजपकडून पालिकेची सत्ता खेचून आणणार आहे, असा मोठा दावा त्यांनी केला.

पिंपरी विधानसभेचे समीकरण बदलणार,आ. बनसोडेंचे टेन्शन वाढणार

आझमभाईंचा करिष्मा शहरात आणि त्यातही पिंपरी विधानसभेत जास्त आहे. तेथील एकगठ्ठा मते ते वळवू शकतात,एवढे तेथे त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे तेथील अजितदादांचे समर्थक विद्यमान आमदार बनसोडेंचे टेन्शन वाढले आहे. त्यांचा भरवसा ज्या मतांवर आहे, ती आझमभाईमुळे आता फिरण्याची मोठी शक्यता आहे. त्यात बनसोडेंच्या झोपडपट्टी आणि अल्पसंख्याक मते त्यात असणार आहेत, तर दुसरीकडे त्याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादीला पिंपरीत होणार आहे. आपला आमदार पिंपरीत करण्याचा शहराध्यक्षांचा दावा यामुळे अधिक बळकट झाला आहे. तेथील त्यांच्या इच्छुकांना आता हत्तीचं बळ मिळाल्याने ते दुप्पट उत्साहाने तयारीला लागणार, यात वाद नाही. एकूणच आझमभाईंमुळे पिंपरीत विधानसभेला समीकरण आता बदलणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

NCP Politics :
Sushma Andhare News : सुषमा अंधारेंनी फडणवीसांना करून दिली 'त्या' पत्राची आठवण; जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com