Baramati Loksabha : बारामती लोकसभा उमेदवारीबाबत बाबाराजे जाधवराव यांचे मोठे विधान !

Political News : पुरंदरमध्ये लवकरच महायुतीचा मेळावा
babaraje jadhvrao, ankita patil
babaraje jadhvrao, ankita patil Sarkarnama

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने यावेळी कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असा निर्धार केला आहे. सात महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि महत्त्वाच्या नेत्यांचा गट घेऊन बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीची जागा महायुती जिंकणार असा निर्धार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामती लोकसभा मतदारसंघाचे आहे. पवार यांनी या मतदारसंघातून एकदा प्रतिनिधित्व केलेले आहे. तर सध्या पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीमधून खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. तर उपमुख्यमंत्री आणि पुण्याची पालकमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

babaraje jadhvrao, ankita patil
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची ACB कडून झाडाझडती

या मतदारसंघावर करत शरद पवार यांच्या राजकीय साम्राज्याला धक्का देण्याचे स्वप्न भाजपने यापूर्वी अनेकदा पाहिलेले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील बारामती काबीज करण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ' ए ' फॉर अमेठी' झाले आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत 'बी' फॉर बारामती' करणारच, असा संकल्पच भाजपने केला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झालेले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेची जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपकडून दौंडचे आमदार राहुल कोण यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत माजी सहकार आणि पणन मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता ठाकरे (Ankita thackrey) यांनी येथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू असून इंदापूर, वालचंदनगर, बारामती या भागात भावी खासदार म्हणून अंकिता यांचे फ्लेक्स देखील लागलेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातच आता भाजपचे पुरंदर-हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नाही, असे विधान केले आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करू, असे जाधवराव यांनी म्हटले आहे. त्यामुळे एक इच्छूक कमी झाल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारामती लोकसभा जिंकण्याचे स्वप्न असून यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 50 हजाराच्या आघाडीने महायुतीचा खासदार निश्चितपणे जिंकून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सासवड येथे घेतला जाणार महायुतीचा मेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसातच पुरंदर तालुक्यातील सासवड येथे महायुतीचा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये महायुतीत सहभागी असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे नेते, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या महायुतीच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत आवश्यक ती चर्चा होऊन पुढील रणनीती ठरवली जाईल असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

babaraje jadhvrao, ankita patil
Ankita Patil Promotion in BJP: हर्षवर्धन पाटलांच्या कन्येवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ आघाडीचे दिले जिल्हाध्यक्षपद

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com