Ankita Patil Promotion in BJP: हर्षवर्धन पाटलांच्या कन्येवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ आघाडीचे दिले जिल्हाध्यक्षपद

Pune BJP News : अंकिता यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा गटातून काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
Ankita Patil-Harshvardhan Patil
Ankita Patil-Harshvardhan PatilSarkarnama

Pune news : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा अंकिता यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अंकिता पाटील यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. (Election of Ankita Patil as Pune District President of Bharatiya Janata Party Yuva Morcha)

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत अंकिता याही भाजपमध्ये आल्या होत्या. अंकिता यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा गटातून काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजय मिळविला होता. राजकारणाचा श्रीगणेशा त्यांनी पिताश्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला होता.

Ankita Patil-Harshvardhan Patil
Dhangar Reservation : धनगर आरक्षण बैठकीबाबत चौंडीतील उपोषणकर्त्याचे मोठे विधान; ‘धनगर समाजाप्रती हे सरकार...’

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने अंकिता पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्या पुन्हा उतरणार का, याकडेही इंदापूरचे लक्ष असणार आहे. तसेच त्यांना जिल्हा पातळीवर आपले नेतृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

दरम्यान, अंकिता पाटील या देशपातळीवर कार्यरत असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्यही आहेत. अंकिता या ठाकरे घराण्याची सून आहेत. (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिता यांचा विवाह झाला आहे.

Ankita Patil-Harshvardhan Patil
Rahul Narwekar's Delhi Tour : दिल्लीला तातडीने जाण्याचे कारण राहुल नार्वेकरांनीच सांगितले…

भारतीय जनता पक्षाने अंकिता यांच्याकडे युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीने जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. ‘भाजयुमो’च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचे चिरंजीव अजिंक्य टेकवडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

Ankita Patil-Harshvardhan Patil
Rajan Patil Vs Umesh Patil : उमेश पाटलांनी कायम ठेवली राजन पाटील विरोधाची धार; ‘खरेदीखतासाठी मोहोळमध्ये यायला कुणाला भीती वाटते?’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com