मोहीम फत्ते! बाबा राम रहीम 21 दिवसांनी पुन्हा तुरुंगात

पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला होता.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram RahimSarkarnama

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला होता. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. पंजाबमधील मतदान पूूर्ण झाल्यानंतर मोहीम फत्ते करून अखेर बाबा पुन्हा तुरुंगात दाखल झाला आहे. राम रहीममुळे भाजपला या निवडणुकीत फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. (Baba Gurmeet Ram Rahim Latest News)

पंजाबमधील मतदान एकाच टप्प्यात झाले असून, राम रहीमचा प्रभाव असलेल्या उत्तर प्रदेशमधील भागांतील मतदानही झाले आहे. या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त राम रहीमने सुटकेसाठी निवडण्यात आला होता. हरियानात भाजपची सत्ता असल्याने भाजपला फायदा व्हावा, या उद्देशानेच त्याची सुटका करण्यात आल्याची अटकळ बांधली जात होत आहे. आता राम रहीमच्या फर्लोचे 21 दिवस पूर्ण झाल्याने त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. राम रहीमचे पंजाबमध्ये 40 लाखांहून अधिक अनुयायी आहेत. त्यामुळे त्याचा निवडणुकांवर कितपत परिणाम पडतो, या निकालानंतरच स्पष्ट होईल.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) एकाच टप्प्यात मतदान झाले. त्याआधी डेऱ्यात मोठ्या हालचाली घडल्या होत्या. राम रहीम कुणाल पाठिंबा देण्याचा संदेश देतो, याकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर त्याने डेऱ्यातून अनुयायांना तोंडी संदेश पाठवले होते. राम रहीमने कोणत्याही एका पक्षाला मतदानाचा आदेश दिलेला नव्हता. त्याऐवजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार निवडून त्याला मतदान करण्याचा आदेश देण्यात आला होता. यात भाजप, अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा समावेश होता. पक्षाऐवजी कोणत्या उमेदवाराने डेऱ्याला मदत केली, हा निकष लावण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Gurmeet Ram Rahim
उच्च न्यायालयात धाव घेऊन सचिन वाझे आला अडचणीत

पंजाबमध्ये अनुसूचित जातींना समोर ठेवून मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना काँग्रेसने चेहरा बनवले आहे. याचवेळी राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी हे अनुसूचित जातींमधील आहेत. काँग्रेसची व्होटबँक असलेल्या हा मतदार राम रहीममुळे पक्षापासून दुरावला जाऊ शकतो. राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim
सोमय्यांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं अडचणीत वाढ

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरुंगात आहे.

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com