Sharad Pawar: मी अजूनही तरुणच...लवकरच नवा इतिहास घडविणार! पवारांचा निर्धार...

Bullock Cart Race Maharashtra: धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळी नावलौकिक मिळेल...
Bullock Cart Race Maharashtra
Bullock Cart Race Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: "ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाची चिंता नाही. शेतमालाला बाजार नाही. कांद्या निर्यातबंदी केल्यानंतर शेतक-यांवर संकट ओढवले आहे. बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय सरकारकडून घेतले जात आहे. पण एकजुटीवर जोरावर महाराष्ट्राचे चित्र लवकरच बदलणार आहे. काहीजण मला म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे, लवकरच नवा इतिहास घडविणार," असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैलगाडा घाटात शेतकऱ्यांसमोर केला.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे "साहेब केसरी" या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहर आणि खेड तालुक्यातील हजारो बैलगाडा शर्यत शौकीनांनी लढत पाहण्यासाठी गर्दी केली होती.

पवारांच्या प्रमुख उपस्थितीत "साहेब केसरी बैलगाडा शर्यती"ची अंतिम लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.

जागतिक पातळी नावलौकिक...

शरद पवार पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत सोहळ्याला उपस्थित होते. "आजपर्यत टिव्हीवर बैलगाडा शर्यती पाहिल्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणं फिटत नाही," अशा शब्दात पवारांनी शर्यतीचे कौतुक केले. "बैलगाडा शर्यत हि वेगवान स्पर्धा आहे. बैलगाडा शर्यतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळी नावलौकिक मिळेल," असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. "बैलगाडा शर्यती या जागितक पर्यटनाचा साधन झाल्या पाहिजे. त्यासाठी शरद पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं," अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

Bullock Cart Race Maharashtra
Salim Kutta Case: बडगुजरांची भेट कुठे झाली? सलीम कुत्ताला नाशिक पोलिस घेणार फैलावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com