Pune News : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून स्पर्धा परीक्षार्थींसह पुण्यातील बालगंधर्व येथे आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनकर्त्यांची माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यावर मोठं विधान केलं आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी सोमवारी एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम सन २०२३ ऐवजी २०२५ पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सरकारने या अगोदर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते.
थोरात म्हणाले, सरकारने या अगोदर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर आश्वासन नको अंमलबजावणी हवी म्हणत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर काय निर्णय होणार याबाबत संभ्रम असून निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे असंही थोरात यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावावा अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. माझे नुकतेच मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका असे मी त्यांना स्पष्ट सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी या विषयात सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत मला अवगत केले. विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना मी त्यांना कळवल्या. या संदर्भात विद्यार्थ्यांचा हा प्रश्न विनाविलंब सोडवावा आणि सरकार म्हणून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचीही विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली.
थोरात म्हणाले, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या या लढाईत मी सोबत आहे. उपाध्यक्ष शिवराज मोरे, GSअक्षय जैन, बळीराम डोळे, राहुल शिरसाठ आदींसह उपस्थित विद्यार्थ्यांना माझे सांगणे आहे. ही लढाई अहिंसक आणि सत्याग्रही मार्गानेच पुढे घेऊन जा. आपण सर्वच एक कुटुंब आहोत, स्वतःला जपा, काळजी घ्या असं आवाहनही थोरात यांनी यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.