Cash Seized in Kasaba and Chinchwad : निवडणुकीत खेळ पैशांचा! चिंचवडध्ये ४३ लाख तर कसब्यात ५ लाखांची रोकड जप्त

Chinchwad Kasaba By-Election : चिंचवड आणि कसबा मतदार संघात पोटनिवडणुकीची धामधूम सुरू
kasaba and Chinchwad By Election
kasaba and Chinchwad By ElectionSarkarnama

Election Commision - पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. या मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या तापलेल्या वातावरणात निवडणूक आयोगाने चिंचवडमधून ४३ लाख तर कसब्यातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ही रक्कम मतदारांन वाटण्यास आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणी प्रशासनाची तयारी चांगली झाल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

kasaba and Chinchwad By Election
By Election : देशात स्वातंत्र्यांनतर प्रथमच राजकीय पक्षाची चोरी; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २६ तारखेला मतदान होत असलेल्या कसब्यासह चिंचवडबाबत ही तसेच निवडणूक तयारीची माहिती दिली. मतदारसंख्या विचारात घेता चिंचवड हा राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

तेथे आजअखेर ४३ लाखांची रोकड, पाच लाख रुपयांची दारू, ९५ हजारांचा गांजा असा ४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यातुलनेत कसब्यात निवडणूक विभागाची ही कारवाई कमी म्हणजे दहा लाख एवढी झाली आहे. तेथे पाच लाखाची रोकड, २१ हजाराची दारू आणि पाच लाख रुपयांचे २५ ग्राम एमडी हा मादक पदार्थ पकडण्यात आले आहे.

kasaba and Chinchwad By Election
Pune News : शिक्षण विभागात खळबळ; पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला लेखाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरिक्षक, दोन पोलीस निरिक्षक व दोन खर्च निरिक्षकांची नेमणूक केलेली आहे. दोन्ही मतदार संघात निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.

चिंचवडसाठी दोन हजार ५५० तर कसबापेठसाठी एक हजार ३५० मतदान कर्मचारी नियुक्त आहेत. चिंचवडला ४७ व कसबापेठमध्ये २५ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक केली. चिंचवडमधील संवेदनशील केंद्रासाठी १५ व कसबापेठसाठी ११ सुक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.

kasaba and Chinchwad By Election
Shivsena Bhavan : शिवसेना भवनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...

कायदा व सुव्यवस्थेसाठी चिंचवडला सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपीच्या प्रत्येकी एक कंपनी, आरपीएफच्या दोन कंपन्या दाखल झाल्या आहेत. कसबापेठसाठी सीएपीएफच्या पाच कंपन्या दाखल आहेत.

पुणे शहर पोलीस विभागाचे कसब्यासाठी दीड हजार पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाकडून चिंचवडसाठी ८३८ पोलीस व १६९ होमगार्ड यांच्या मार्फत बंदोबस्त केला जाणार आहे. याबाबत माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com