Balasaheb Shivarkar News : सन्मित्र सहकारी बँकेवर माजी मंत्री शिवरकरांचेच वर्चस्व; 17 जागांवर मारली बाजी

Political News : बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर पॅनेल प्रमुखांसह उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
Sanmitra sahkari bank
Sanmitra sahkari bank Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सन्मित्र सहकारी बँकेने गेल्या वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील सन्मित्र प्रगती पॅनेलने सतराही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विजयानंतर पॅनेल प्रमुखांसह उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.

या निवडणुकीसाठी सन्मित्र प्रगती पॅनेल विरोधात सर्वसाधारण गटातून केवळ एक, महिला गटातून दोन, अनुसूचित जाती-जमाती गटातून एक, इतर मागासवर्ग गटातून एक, तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून एक असे सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सन्मित्र प्रगती पॅनेलने प्रचारात लावलेली ताकद पाहता विरोधी उमेदवारांचे मोठे आव्हान असलेले जाणवत होते.

Sanmitra sahkari bank
Maratha Reservation News : भाजपचे बाहुले बनलेले 'ते' चार नेते कोण?

सर्वसाधारण गटातून (कंसात मिळालेली मते) विजय कोद्रे (३३१९), डॉ. हेमंत गाढवे (३२४१), सुनील गायकवाड (३२७४), योगेश गोंधळे (३३०९), दिलीप टकले (३२२०), प्रशांत तुपे (३१७५), अमोल धर्मावत (३२२७), ॲड. विजय राऊत (३२८४), अभिजित शिवरकर (३२८५), संजय शेवाळे (३२२९), चंद्रकांत ससाणे (३२७५), यशवंत साळुंखे (३२१८), महिला राखीव गटातून सविता गिरमे (३१६९), रेश्मा हिंगणे (३०५७), अनुसूचित जाती-जमाती गटातून रमेश काकडे (३४३३), इतर मागासवर्ग गटातून गणेश फुलारे (३४१७) तर भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून विशाल हाके (३४१६) हे उमेदवार विजयी झाले. उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

सन्मित्र प्रगती पॅनेलच्या सर्वसाधारण गटातील बारा उमेदवारांच्या विरोधात पराभूत नितीन टिळेकर यांची एकमेव उमेदवारी होती. त्यांना केवळ ३६५ मते मिळाली. महिला राखीव गटातील वृषाली कोद्रे (२५३) व अश्विनी शेवते (३१०), अनुसूचित जाती-जमाती गटातून प्रकाश सोनवणे (१७५), इतर मागासवर्ग गटातून काळुराम हिंगणे (२३१), भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून गणेश गायकवाड (२२६) यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी नगरसेवक योगेश ससाणे (Yogesh Sasanae) , सुनील बनकर, शिवाजी केदारी, कविता शिवरकर, सोपान गोंधळे, मोहन कांबळे, महेंद्र बनकर, दामोदर राऊत, बाळासाहेब कोद्रे, ॲड. प्रभाकर शेवाळे यांनी एकत्र येत निवडणूक प्रचार केला होता. काही जणांना आपलेसे करण्यात माजी मंत्री शिवरकर यांना यश आल्याने विरोधकांचा पूर्ण क्षमतेने पॅनेल निवडणुकीत उतरू शकला नाही.

बँकेच्या सभासदांना आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची वाटत आहे. त्या विश्वासाने ते आमच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाकडे पाहतात. या निवडणुकीतून सभासदांनी पुन्हा एकदा सन्मित्र प्रगती पॅनेलच्या उमेदवारांना विश्वासाने संधी दिली आहे. सभासदांच्या या विश्वासाला तडा जाणार नाही, याची निश्चितपणे काळजी घेतली जाईल, असे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivrakar ) यांनी सांगितले.

R

Sanmitra sahkari bank
Pune Lok Sabha : धंगेकर, जोशी, शिंदेंनंतर आता माजी मंत्र्याने पुणे लोकसभेवर ठोकला दावा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com