Crime News : केअरटेकरच्या तोंडात बोळा, सुरक्षारक्षकाला चावा अन् 13 बांगलादेशी मुली पळाल्या...

Bangladeshi Girls Escape Pune : पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. त्यात दोन मुली सापडल्या आहेत, पण उर्वरित ११ मुली अजूनही बेपत्ता आहेत.
Police investigation underway after 13 Bangladeshi girls escaped from Rescue Foundation shelter and assaulted a caretaker.
Police investigation underway after 13 Bangladeshi girls escaped from Rescue Foundation shelter and assaulted a caretaker.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील हडपसर, महंमदवाडी रोडवरील ‘रेस्क्यू फाउंडेशन’ या मानवी तस्करीविरोधी संस्थेतून १३ बांगलादेशी मुलींनी रात्रीच्या अंधारात थरारक पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना इतकी नियोजनबद्ध होती की, ती एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखी वाटावी.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांच्याकडे आली आणि म्हणाली, “मला औषध हवे आहे, दरवाजा उघडा.” ज्या क्षणी लक्ष्मी यांनी दरवाजा उघडला, त्या क्षणी आत दबा धरून बसलेल्या चार मुलींनी एकदम हल्ला केला. त्यांना मारहाण करून हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला आणि वैद्यकीय कक्षात कोंडून टाकले.

त्याच वेळी संस्थेच्या आवारात साफसफाई चालू होती. सुरक्षारक्षकाने मुख्य दरवाजा चुकून उघडा सोडला होता. याचा फायदा घेत उरलेल्या मुलींनी एका झटक्यात सुरक्षारक्षकाला ओढले, त्याचा चावा घेतला आणि १३ जणींचा समूह एकदम बाहेर पळाला. सगळे काही सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट कैद झाले आहे.

अजून ११ मुली बेपत्ता

घटनेची माहिती मिळताच संस्थेने तात्काळ हडपसर पोलिसांना कळवले. पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. त्यात दोन मुली सापडल्या आहेत, पण उर्वरित ११ मुली अजूनही बेपत्ता आहेत. काळेपडळ पोलिस स्टेशनकडून सध्या शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर घटनेत हडपसर पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. फक्त ‘जनरल डायरी’ नोंद करण्यात आली आहे.

Police investigation underway after 13 Bangladeshi girls escaped from Rescue Foundation shelter and assaulted a caretaker.
Nashik Crime : नाशिकमध्ये खरात पार्ट 2, ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, 121 महिलांचे अश्लील व्हिडिओ..

संस्थेनी मांडली व्यथा

‘रेस्क्यू फाउंडेशन’ ही संस्था मुख्यतः मानवी तस्करीतून वाचवलेल्या महिलांना आणि मुलींना आश्रय देते. संस्थेच्या म्हणण्यानुसार, १६ मार्च २०२४ पासून त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ते पुन्हा मिळाले नव्हते. सध्या संस्थेत क्षमतेपेक्षा जास्त महिला वास्तव्य करत आहेत. बांगलादेशी मुलींच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला १ ते २ वर्षे लागतात. या प्रक्रियेच्या संथ गतीमुळे मुलींमध्ये नैराश्य येऊन असे टोकाचे पाऊल उचलले जाते, असे संस्थेचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी बुधवार पेठ परिसरामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून बांगलादेश मधून अवैधरित्या मानवी तस्करी करून आणलेल्या महिलांची सुटका केली आहे. मात्र सुटका केल्यानंतर पुन्हा त्यांना बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं तब्बल एखाद दोन वर्ष या प्रक्रिया लागत असल्याने अशा प्रकारे पलायन होत असल्याचं तज्ञांचे म्हणणं आहे.

Police investigation underway after 13 Bangladeshi girls escaped from Rescue Foundation shelter and assaulted a caretaker.
Ashok Kharat : दोन-तीन बड्या नेत्यांच्या फोटोवर फुली ; आता थेट दिल्लीतून अशोक खरातच्या विरोधात तगडी केस उभी करण्याच्या हालचाली..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com