Ajit Pawar Banner in PCMC : `दादा,आम्ही तुमच्यासोबत.. नंतर पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

PCMC Politics | भाजप प्रवेशाच्या चर्चेवरील खुलाशानंतर अजितदादा हे आज प्रथमच पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

PCMC Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांत राज्यात मोठा धुरळा उठला.त्यांच्या समर्थानार्थ पिंपरीचे पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी जिथं अजितदादा,तिथं मी, असे पाठिंब्याचे पहिले जाहीर वक्तव्य केल्याने त्याचीही चर्चा झाली.

दरम्यान, अजितदादांनी शेवटपर्यंत राष्ट्रवादीत (NCP) राहणार असल्याचा खुलासा केल्यानंतरही या चर्चेचे पडसाद अद्याप उमटतच आहेत. त्यांचे कट्टर समर्थक असलेले आ.बनसोडे यांनी त्यांना २०१९ च्या अयशस्वी बंडातही साथ दिली होती.तर, आताही ते दादांच्या समर्थानार्थ पहिल्यांदा ठामपणे उभे राहिले.दादा जो निर्णय घेतील, तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहे,असे बनसोडे नुकतेच (ता.१७) म्हणाले होते.

Ajit Pawar News
Vishal Phate Fraud Case in Pune : पुण्यात विशाल फटेचा नवा अवतार; १६ कोटींच्या फसवणूकप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल !

भाजप प्रवेशाच्या चर्चेवरील खुलाशानंतर अजितदादा हे आज प्रथमच पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. शहर पक्षाच्या मासिक बैठकीला ते हजेरी लावणार आहेत.ही संधी साधून त्यांचे शहरातील कट्टर माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी,तर आपल्या रावेत प्रभागासह (क्र.१६)शहरात अजितदादांच्या समर्थनाचे होर्डिंग्जच लावले आहेत. (BJP-NCP Politics)

आम्ही तुमच्या सोबत आज,उद्या आणि सदैव असा मजकूर असलेले हे फलक लक्षवेधी ठरले आहेत.त्याची चर्चा सुरु झाली आहे. ते लावण्यामागील उद्देश काय अशी विचारणा केली असता,अजितदादांच्या काळातच म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता पालिकेत असताना शहराचा विकास झाला असल्याने त्यांच्या समर्थनार्थ हे होर्डिंग्ज लावल्याचे भोंडवे यांनी सरकारनामाला सांगितले.मात्र,गेल्या पाच वर्षात भाजपच्या सत्ताकाळात शहराचा विकास नाही,तर ते भकास झाले असून भ्रष्टाचाराने सर्वोच्च पातळी गाठली आहे,असा हल्लाबोलही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com