पिंपरी : गेल्या काही दिवसापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणेंचा (Nitesh Rane) अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते आज्ञातस्थळी असून समोर आलेले नाहीत. आमदार नितेश राणे बद्दलची माहितीसाठी नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन आता विविध ठिकाणी पोस्टरबाजी दिसून येत असून काही ठिकाणी नितेश राणे हरवले आहेत त्यांनी शोधनारांना बक्षिस दिले जाईल, अशी नितेश यांची खिल्ली उडवली जात आहे. तर, कोकण तसेच, मुंबईत व पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. लावण्यात आलेले बॅनर रस्त्यावरूवरून ये-जा करणारे नागरिक मोठ्या कुतूहलाने बघत आहेत.
दरम्यान, गुरुवारी (ता.30 डिसेंबर)संतोष परब हल्ला प्रकरणात सुनावणी दरम्यान नितेश राणे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा फिर्यादींच्या वकिलांनी केला होता. मात्र, आमदार नितेश राणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बोलताना केला. त्यानंतर दोन दिवसांच्या सुनावणी नंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. जामीनासाठी अर्ज दाखल केल्यापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोचक टीका केली जात आहे. तर, राणेंच्या समर्थकांकडून सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी जोरात केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.