Bapusaheb Pathare : "ताई आहे का घरात, तुतारी आलिया दारात..", बापूसाहेब पठारे यांचा प्रचार शिगेला

Vadgaon Sheri Assembly constituency: आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे.
Bapusaheb Pathare
Bapusaheb PathareSarkarnama
Published on
Updated on

सागर आव्हाड

Pune Election: काल 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. दिवाळीमुळे मंदावलेला प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. "ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं," अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचाराला सुरुवात केली आहे.

Bapusaheb Pathare
Purandar Vidhan Sabha: एकनाथ शिंदे-अजितदादांमध्ये खटका उडाला ? पुरंदरचा राजकीय 'तह' फिसकटला ! बंडखोर रिंगणात

मंगळवारी सकाळी तर वडगाव शेरी परिसरात प्रचाराची दिंडी पाहायला मिळाली. टाळ मृदुंग आणि तुतारीच्या गजरात बापूसाहेब पठारे यांचा प्रचार सुरू होता. तर काही नागरिकांनी ताई आहे का घरात तुतारी आली या दारात अशा प्रकारची गाणी गाऊन मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातोय.

Bapusaheb Pathare
Pune Election: महायुती पुणे जिल्ह्यातील इतक्या जागा जिंकणार; पंकजा मुंडेंनी आकडाच सांगितला

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि (अजित पवार) राष्ट्रवादी काँग्रेस सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे. बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी मिळणार हे खूप आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी आधीपासूनच घरोघरी भेट देत प्रचाराला सुरुवात केली होती. तर सुनील टिंगरे यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली. तत्पूर्वी महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावर चर्चा झाली. अखेर सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी मिळाल्यानंतर सुनील टिंगरे हे देखील प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे वडगाव शेरीत या दोन्ही उमेदवारांच्या रूपाने काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com