Bazar Samiti Election : बारामती बाजार समिती पुन्हा राष्ट्रवादीकडे ; अजितदादांच्या रणनीतीमुळे भाजपचा सुपडा साफ

Bazar Samiti Election Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Bazaar Committee NCP Bazar Samiti Election Ajit Pawar : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच या मतदानाचा कल लक्षात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली होती. स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घालून व्युव्हरचना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत मात करीत विजय प्राप्त केला.

बारामती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.

यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलने राष्ट्रवादी पुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, प्रत्यक्षात मात्र भाजपच्या सर्व उमेदवारांना किरकोळ मते मिळाल्याने राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला.

भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी देखील मतदारांकडे गाठीभेटी घेत बदल घडविण्याची विनंती केली होती मात्र मतदारांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलवर विश्वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले.

Ajit Pawar
Bazar Samiti Election: दूध संघानंतर बाजार समितीतही भाजप आमदार चव्हाणांचे वर्चस्व ; चाळीसगावात सत्ता खेचून आणली..

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, "बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत रयत पॅनेलवर मतदारांनी जो विश्वास दाखविला, माझ्या आवाहनाला जो प्रतिसाद दिला, तो विश्वास माझे सर्व नवनिर्वाचित सहकारी सार्थ ठरवून दाखवतील. दोन वगळता सर्वच नवीन चेहरे असल्याने ते जोमाने काम करतील. बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावी कसे होईल, याचाच आमचा प्रयत्न असेल,"

Ajit Pawar
Bazar Samiti Election : भुसावळमध्ये खडसेंना मोठा धक्का ; भाजप आमदार सावकारेंनी धुळ चारली..

बाजार समितीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

कृषी पतसंस्था सर्वसाधारण- विनायक महादेव गावडे (1178), सतीश सर्जेराव जगताप (1141), रामचंद्र शामराव खलाटे (1153), बापूराव दौलतराव कोकरे (1166), दयाराम सदाशिव महाडीक (1148), सुनिल वसंतराव पवार (1131), दत्तात्रय शंकरराव तावरे (1116),

कृषी पतसंस्था महिला- शोभा विलास कदम (1211), प्रतिभा दिलीप परकाळे (1233), कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती जमाती- शुभम प्रताप ठोंबरे (1210), कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग – नीलेश भगवान लडकत हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

ग्रामपंचायत सर्वसाधारण- विशाल ज्ञानदेव भोंडवे (430), विश्वास तानाजी आटोळे (424), ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल- युवराज कैलास देवकाते (437), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती- अरुण गणपत सकट (451), व्यापारी व आडते- मिलिंद अशोक सालपे (220) व संतोष पांडुरंग आटोळे (204), हमाल व तोलारी-नितीन शंकर सरक (141).

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com