Bazar Samiti Election : भुसावळमध्ये खडसेंना मोठा धक्का ; भाजप आमदार सावकारेंनी धुळ चारली..

Bhusawal Market Committee : माजी आमदार संतोष चौधरी यांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.
Eknath Khadse & Sanjay Savkare
Eknath Khadse & Sanjay SavkareSarkarnama
Published on
Updated on

Bhusawal Market Committee Eknath Khadse : भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. या विजयामुळे भुसावळ मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

भुसावळ बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी बाजी मारली आहे. १८ पैकी तब्बल १५ जागावर त्यांनी विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली चौधरी यांनी पॅनेल उभे केले होते. यात महाविकास आघाडीला फक्त तीनच जागा मिळाल्या आहेत.

Eknath Khadse & Sanjay Savkare
Raver APMC Election Results : रावेर बाजार समितीत 'मविआ'ची आघाडी ; आठ जागा पटकाविल्या..

भुसावळ बाजार समितीत भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या बाजार समितीत संतोष चौधरी यांचे वर्चस्व होते, ते कायम ठेवण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते.

Eknath Khadse & Sanjay Savkare
CBI News : पालघर साधू हत्येची चौकशी CBI कडे देणे हे फडणवीसांचे अपयश ; काँग्रेसचा घणाघात

आमदार सावकारे यांनी सत्ता खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. यात आमदार सावकारे यशस्वी झाले आहेत, त्यांच्या गटाचे तब्बल १५ उमेदवार विजयी झालेआहेत. त्यामुळे एकहाती सत्ता आणण्यास त्यांना यश मिळाले आहे,चौधरी यांच्या गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा बाजार समिती संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, १८ पैकी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडीने आपली ताकद दाखविली आहे.

पारोळा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वर्चस्वाची कसोटी आहे. मतमोजणीच्या प्रारंभी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडी आघाडीवर आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com