बारामती तालुक्यातील निंबुत येथे झालेल्या सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी बैलाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावरून गुरूवारी रात्री गोळीबार ( firing ) झाला होता. यात फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते.
निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहाजीराव काकडे ( Shahajirao Kakade ), गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, गौतम काकडे सध्या फरार असून बारामती पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं घडलं काय?
निंबाळकर आणि काकडे यांच्यात बैलाच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहार होता. त्यातून गुरूवारी रात्री वाद झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला की गौरव काकडेंनी निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीनं पुण्यात उपचारासाठी दाखल केलं. पण, उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे यांच्यासह तीन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शहाजीराव काकडे आणि गौतम काकडे यांना अटक केली आहे. पोलिस गौरव काकडे यांचा शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.