Marathwada Flood Relief: बारामतीच्या चिमुकल्यांनी दाखवली 'मनाची श्रीमंती' अन् जिंकलं अजितदादांचं मन! 'खाऊ'साठी जमवलेले पैसे दिले पूरग्रस्तांसाठी...

Marathwada Flood : राज्याला गेल्या काही दिवसांपासून तुफानी पावसाचा तडाखा बसत आहे. सुमारे 70 लाख एकर शेतीचं या पावसानं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मराठवाड्यातील धाराशिव,बीड,लातूर,सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये कष्टानं उभे केलेले संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
Ajit Pawar baramati news.jpg
Ajit Pawar baramati news.jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: राज्याला गेल्या काही दिवसांपासून तुफानी पावसाचा तडाखा बसत आहे. आजपर्यंत सुमारे 70 लाख एकर शेतीचं नुकसान या पावसानं झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच मराठवाड्यातील धाराशिव,बीड,लातूर,सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये कष्टानं उभे केलेले संसार,जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं कुटुंबचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीच्या घोषणेकडे पूरग्रस्तांचं लक्ष लागलेले आहेत. अशातच बारामतीतून एक डोळ्यात टचकन पाणी आणणारी बातमी समोर आली आहे.

खाऊ,शिक्षण,खेळणं-बागडणं यापलीकडच्या दुनियादारीशी ज्या वयात काही घेणंदेणं नसतं, त्याच वयात माणुसकीचा एक नवा अध्याय बारामतीतील (Baramati) दोन चिमुकल्यांनी समाजासमोर ठेवला आहे. त्यांनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीनं नेहमी रोखठोक आणि कठोर वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवारही काही क्षण भारावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (ता.27) बारामती दौऱ्यावर आले होते.मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांतील पाहणीनंतरचा हा पहिलाच बारामती दौरा होता.एकीकडे पाऊस आणि पुरानं उध्वस्त आणि हतबल झालेल्या कुटुंबांना,शेतकऱ्यांसाठी एखादी छोटीशी मदतही लाखमोलाची ठरताना दिसून येत आहे.

राज्य सरकारकडूनही नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच समाजसेवी संस्था,काही संघटना,नेतेमंडळी,अधिकारी,शिक्षक यांच्यासह ज्यांना ज्यांना शक्य आहे,अशा सर्वांकडूनच पूरग्रस्तांकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पण त्याचवेळी अजित पवारांसमोरच (Ajit Pawar) घडलेल्या एका प्रसंगानं त्यांनाही मोठा धक्का बसला.

Ajit Pawar baramati news.jpg
Congress News : 'काँग्रेस ओबीसींचा नव्हे,तर पराभूतांचा पक्ष...'; पटोलेंच्या नेतृत्वात मोठी जबाबदारी सांभाळलेल्या नेत्यानंच डागली तोफ

बारामतीतील एका 9 वर्षांच्या मुलीनं आणि एका 5 वर्षांच्या चिमुकल्यांनी आपल्या खाऊसाठी जमवलेले पैसे 2300 रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत म्हणून दिले.हे सर्व पैसे या दोन चिमुकल्यांना त्यांच्या पाहुण्यांनी खाऊसाठी म्हणून दिल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बारामतीतील सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेल्या किरण आळंदीकर यांच्या घरी अजितदादांनी पाहुणचार घेतला. यावेळी आळंदीकर यांची नऊ वर्षांची नात राजनंदिनी आणि पाच वर्षांचा नातू राजवीर यांनी मनाची श्रीमंती दाखवली.या चिमुकल्यांनी 2300 रुपयांची मदत अजितदादांकडे देऊ केली.

Ajit Pawar baramati news.jpg
BJP Politics : पडळकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी नगरसेवकाने चंद्रकांत पाटलांसमोरच...

चिमुकल्यांच्या या कौतुकास्पद कृतीनं उपस्थितांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचंही मन जिंकलं.अजितदादांनी यावेळी राजनंदिनी आणि राजवीर या भाऊ बहिणीच्या मदत करण्याच्या वृत्तीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बारामती येथील सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मदतीचं आवाहन केले जात होते. त्याचवेळी ही लहानगे भाऊ-बहीण पुढे आले. त्यांनी आम्ही खाऊसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांच्या मदतीला द्यायचे असल्याची भावना बोलून दाखवली. आणि 2300 रुपये तत्काळ अजितदादांकडे सूपूर्दही केली.

Ajit Pawar baramati news.jpg
Vaibhav Khedekar : दोनवेळा प्रवेश हुकला; बडतर्फ मनसे नेत्याचा भाजप प्रवेश बड्या राजकीय नेत्यामुळे रखडला

अजित पवार म्हणाले, या चिमुकल्यांच्या मनात आलेली मदतीची भावना अतिशय कौतुकास्पद असून याच पद्धतीची शिकवण सगळ्यांना दिली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. तसेच अशीच कर्तृत्ववान मुलं प्रत्येक आई बापाच्या पोटी जन्माला यायला हवी.या दोन लहानग्यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचं बारामतीकरांच्या वतीनं कौतुकही अजित पवारांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com