Supriya Sule on Sharad Pawar: श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी...असं सुळे का म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates: बोर्डाचे पेपर ज्याप्रमाणे पारदर्शकपणे होतात, त्याचप्रमाणे ही निवडणूकदेखील पारदर्शकपणे व्हावी, अशी आमची इच्छा असल्याने आम्ही इन कॅमेरा मतदान घेण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya SuleSarkarnama

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency 2024) आज मतदान होत असताना आरोप प्रत्यारोपाची राळ उठली आहे. गुंडांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येत आहे. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील उत्तर दिलं असून त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील बोलल्या आहेत.

बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, "बारामती लोकसभा मतदारसंघात इन कॅमेरा मतदान घ्यावं अशी मागणी केली होती, याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, देशामध्ये ज्या निवडणूका होत आहे ते पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे.

बोर्डाचे पेपर ज्याप्रमाणे पारदर्शकपणे होतं त्याचप्रमाणे ही निवडणूक देखील पारदर्शकपणे व्हावी अशी आमची इच्छा असल्याने आम्ही इन कॅमेरा मतदान घेण्याची मागणी केली असल्यास सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओंबाबत, बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की काल रात्री बारामतीतील काही भागांमध्ये वेल्हा आणि भोर मधून पैसे वाटपा संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या याबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, ही आमची अपेक्षा आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Kolhe Vs Adhalrao: आढळरावांना नाटकं जमत नाहीत, मात्र धंदा चोख जमतो; कोल्हेंचे उत्तर

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या विश्वासार्हते बाबत अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्याच्यावर बोलताना त्या म्हणाल्या. त्या व्हिडिओमध्ये वेळ आणि तारीख दिसत आहे. या वरून हे व्हिडिओ कधीचे आहेत हे स्पष्ट होत आहे.

पैसे वाटपाचे व्हिडिओ हे व्हायरल झालेले नसून ते वास्तव आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये असं यापूर्वी मी कधीही पाहिलं नाही. मी तीन वेळा बारामाती मधून निवडणूक लढवली आहे.

पवार साहेब देखील या भागाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र सध्या जी गुंडांची टोळी फिरत आहे. आणि जे व्हिडिओ समोर येत आहेत. त्याची नोंद पोलिसांनी आणि इलेक्शन कमिशन यांनी घ्यायला हवी अशी आमची विनंती आहे.

सुप्रिया सुळे यांना विजयाबाबत किती विश्वास असल्याचा विचारला असता त्या म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येत असतो परंतु त्या संघर्षवर मात करणे मी माझ्या आईकडून आणि वडिलांकडून शिकले आहे. त्यामुळे माझ्या श्रमलेला बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule
Lok Sabha Election 2024 Voting LIVE: प्रत्येक मत महत्वाचं; शरद पवारांनी मुंबईऐवजी माळेगावात बजावला मतदानाचा हक्क

शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारला असत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या ते स्वतःला 84 चे नाही तर 48 समजतात. इलेक्शन आणि लोक हे त्यांचे टॉनिक आहे.पुढे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मी तीन वेळा इलेक्शन लढले आहे, मात्र सध्या गुंड फिरत आहेत, बँका रात्रभर उघड्या आहेत पैसे वाटले जात आहेत, दमदाट्या, धमक्या या कधीच कानावरती आल्या नव्हत्या. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com