Baramati Lok Sabha Election 2024 : भावजय विरुद्ध लढतीत नणंदेची आघाडी; सुळेंचा 'डेमू'तून प्रचार...

Supriya Sule News : नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 :
Baramati Lok Sabha Election 2024 : Sarkarnama
Published on
Updated on

Pune (Baramati) News : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नसताना बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडत, आरोप - प्रत्यारोप करत ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनवली आहे. (Latest Marathi News)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर आठ महिन्यांपूर्वी राज्यात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेले आणि उपमुख्यमंत्री पद घेतलेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील या मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीने अद्यापही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, असे असले तरी खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील विविध भागात वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहाेचून प्रचार करण्यास या दोघींनी सुरुवात केली आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत हा प्रचार केला जात आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 :
Baramati Loksabha News : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आणखी एक पवार मैदानात...

बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने आणि महायुतीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख या मतदारसंघाची आहे. शरद पवार हे या मतदारसंघातून अनेकदा विजय झाले आहेत, तर गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी महत्त्वाच्या नेत्यांना बरोबर घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे -फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर ते सत्तेतदेखील सहभागी झाले.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार केंद्र सत्ताधारी असलेल्या भाजपने केला आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू असून, महायुतीकडून सुनेत्रा पवार यांचे तिकीट निश्चित मानले जात आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 :
Ajit Pawar : अजितदादांची 'बारामती'त मोर्चेबांधणी! म्हणाले, 'शब्द जपून देतो, पण...'

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अनेक राजकीय गणिते बदलणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत शरद पवार हे बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तेदेखील आपल्या पद्धतीने समाजातील वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करत संवाद साधत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. त्यानंतर या प्रचाराला अधिकच वेग येणार आहे.

मतदारांनी आपला अधिकार बजवावा -

उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, तर निवडणुकीत विजय मिळविणे सोपे नाही, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनीदेखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचारासाठी नवीन युक्त्या वापरणे सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे ते दौंड डेमूने प्रवास करत आपला प्रचार केला. डेमूमधून प्रवास करत सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. खासदार म्हणून केलेल्या विविध कामांची माहिती मतदारांना देत येणाऱ्या काळात अधिकाधिक नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला अधिकार बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com