Baramati Lok Sabha Election 2024 Voting: मतदानात बारामतीकरांचा निरुत्साह; फटका कुणाला बसणार?

Lok Sabha Election 2024 Voting updates in Marathi:बारामती शहर आणि परिसरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४. ७५ टक्के मतदान झाले. बारामती शहर आणि परिसरात घटलेल्या या मतदानाचा फटका कोणाला बसणार, हे चार जूनला समजेल.
Baramati Lok Sabha Seat
Baramati Lok Sabha SeatSarkarnama
Published on
Updated on

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे (Baramati Lok Sabha Election 2024 Voting) देशाचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार (Aajit Pawar) यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती शहर आणि परिसरातून कसे मतदान होणार, याबाबत उत्सुकता होती.

वाढत्या उन्हामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण 59. 67 टक्के इतके मतदान झाले आहे.काही ठिकाणी पैसे वाटल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.किरकोळ वादावादी आणि आक्षेपांचे प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. सकाळी मतदानाचा वेग कमी होता, दुपारनंतर संथ गतीने मतदान सुरु होते.

Baramati Lok Sabha Seat
Narendra Modi News: मोदींना दिवंगत मुंडेंची आठवण ; म्हणाले, 'उनसे दिल का रिश्ता था...!

बारामती शहर आणि परिसरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४. ७५ टक्के मतदान झाले. बारामती शहर आणि परिसरात घटलेल्या या मतदानाचा फटका कोणाला बसणार, हे चार जूनला समजेल. ज्येष्ठ नेते शरद पवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी मतदान केले.

बारामतीत अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर अपेक्षित गर्दी नव्हती. अपवादाने काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. काटेवाडी, माळेगाव, डोर्लेवाडी यांसह आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, आंजणगाव, बाबुर्डी, बजरंगवाडी, बऱ्हाणपूर, भिलारवाडी यांसह सुपा, मोरगाव, कऱ्हा वागज, नीरा वागज या ग्रामीण भागातही दुपारपर्यंत प्रतिसाद नव्हता. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी दिसून आली.

दौंड विधानसभा मतदारसंघात काही मतदारांनी नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी गर्दी केल्याने दौंड शहरात रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत ४३ टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदान संथ गतीने सुरू असताना दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दौंड तालुक्यात एकूण ३ लाख ४ हजार ६०७ मतदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com