Supriya Sule Vs Ajit Pawar : तुम्ही 18 वर्षे पालकमंत्री तुमच्याच हातात पुण्याचा कारभार मग...,सुळेंचा अजित पवारांना सवाल !

Baramati Lok Sabha Constituency : निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून अनेक वर्षे या संस्था विश्वासाच्या नात्याने काम करत आहेत. मात्र जेव्हा या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं तेव्हा वेदना होतात...
Supriya Sule vs Ajit Pawar
Supriya Sule vs Ajit PawarSarkarnama

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर एमआयडीसीचा प्रश्न निवडणूक प्रचारातील कळीचा मुद्दा बनला आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमने सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात भोर एमआयडीसीच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले होते. त्यावरून आता सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना प्रतिसवाल केला आहे.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा दरम्यान एका मेळाव्यात अजित पवार यांनी ही निवडणूक भावकीची आणि भावनिक नाही. ही रोजी रोटीची आहे. काही लोक भोर, वेल्हेकरांना एमआयडीसीचा स्वप्न दाखवून गेले. एमआयडीसीच्या मुद्द्यावरती 2014 ला मत मागितली. मात्र हे एमआयडीसीचं काम पूर्ण केलं नाही तरी देखील तेच लोक 2019 ला मत मागायला आले होते आणि आताही मते मागत आहेत. मी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने मत मागता ? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule vs Ajit Pawar
Ajit Pawar News : साहेबांना दैवत मानत होतो, ताईंबाबत 17 वर्षांनी प्रकाश पडला, नेमकं काय म्हणायचंय दादांना !

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवरती भाष्य केले. सुळे म्हणाल्या, एमआयडीसी बाबत होत असलेल्या बैठकांमध्ये अजित पवार यांचा सहभाग होता. अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होते, ज्याने आमच्या एकत्र मिटींग घेतला आहेत, ते स्वतः अनेक मिटींगला होते. एमआयडीसी का झाली नाही ? कारण भूसंपादन झालं नाही, दादा स्वतः 18 वर्षे पुण्याचे पालक मंत्री राहिले आहे. आदरणीय दादांच्या हातात पुण्याचा सगळाच कारभार होता असं उतर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षे या संस्था विश्वासाच्या नात्याने काम करत आहेत. मात्र जेव्हा या संस्थांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं तेव्हा वेदना होतात. सुप्रिया सुळे यांच्याबाबत सतरा वर्षांनी आपल्या डोक्यात प्रकाश पडला असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हला माहित आहे, दादा कसे बोलतात असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

Supriya Sule vs Ajit Pawar
Devendra Fadnavis News : "...तर मी सोडणार नाही," फडणवीसांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना थेट इशारा

सुनंदा पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. कोणी प्रश्न विचारला मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही. आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याला मी उत्तर देईल. मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही, असे उत्तर दिले होते. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला याबद्दल काही माहीत नाही, मला विश्वास बसत नाही तो असा बोलू शकतो,मी चेक करून बोलते.

(Edited by : Chaitanya Machale)

Supriya Sule vs Ajit Pawar
Prithviraj Chavan On Narendra Modi : ...म्हणून मोदींकडून शेतकऱ्यांचा सूड, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com