Baramati News: मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामतीत ठाकरे मैदानात...

Bjp Mission: 'A फॉर अमेठी' झालं आता 'B फॉर बारामती'साठी भाजपनं कंबर कसली आहे.
Baramati loksabha election 2024
Baramati loksabha election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News:आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड सर करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी यासाठी नियोजन केले आहे. येणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभेवर पक्षाचा झेंडा फडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आणि इतर पक्षांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी रणनीती ठरवू लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे येथून नेतृत्व करतात. केंद्रात सत्ता आल्यानंतर बारामतीची जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. पण त्यामध्ये अद्याप यश आलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनल फॉलो करा!)

Baramati loksabha election 2024
Congress : काँग्रेसला समोसाही परवडेना; भाजपची संपत्ती डोळे दीपवणारी...

काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि शरद पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून 'A फॉर अमेठी' आणि 'B फॉर बारामती' अशी घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यातील अमेठीची जागा भाजपने जिंकली. मात्र बारामतीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 'B फॅार बारामती'ची जागा जिंकण्याचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केले आहे.

मिशन बारामती

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच्या सर्वच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या अनेक नेत्यांनी वारंवार सांगितले. 'मिशन बारामती' या मोहिमेंतर्गत भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय. भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी 'A फॉर अमेठी' झालं तसंच 'B फॉर बारामती' होणार असेही म्हटले. हीच री आता बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी ओढली. बारामती जिंकणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे.. त्यामुळे 'A फॉर अमेठी' झाले तसेच 'B फॉर बारामती' होणार असे म्हटले आहे.

Baramati loksabha election 2024
Ram Mandir Inauguration Guest : उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राऊत म्हणाले, 'ज्याचं योगदानच नाही, त्यांचा तो सोहळा...'

कोण आहेत अंकिता ठाकरे

अंकिता ठाकरे या भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या त्या सदस्या होत्या. त्या स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून येतात. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा देखील केला होता.

(Edited By - Chaitanya Machale)

Baramati loksabha election 2024
Pune BJP Office : मुरलीधर मोहोळ, धीरज घाटेंना भाजपसाठी कुणी ऑफिस देता का ऑफिस! पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com