Sharad Pawar : 'सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही', शरद पवारांनी ठणकावले

Baramati Loksabha : या तालुक्यात सत्तेचा गैरवापर करत असतील तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचे काम एक ते दोन दिवसांत करू शकतो, असा इशारा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी काही प्रश्न मांडले त्यांना जेलमध्ये टाकले.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणाचा आजचा (रविवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अजित पवार Ajit Pawarआणि शरद पवार यांनी आज सभांचा धडाका लावला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवाज बसला असताना ही त्यांनी इंदापूरच्या सभेत जोरदार भाषण करताना सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही, असा थेट इशाराच दिला.

Sharad Pawar
Ajit Pawar News : "2014 मध्ये जानकर बारामतीत कमळावर लढले असते, तर सुपडा साफ झाला असता," अजितदादांचं विधान

'सत्तेचा गैरवापर करून कुणी दमदाटी करत असेल तर जागा दाखवा. सत्तेचा माज काही लोकांना चढलाय. हा माज उतरवायला वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. जे लोक तुम्हाला दमदाटी करत असतील तर यत्किंचितही चिंता करू नका हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी कायम राहिल.', असे शरद पवारांनी Sharad Pawar ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या तालुक्यात सत्तेचा गैरवापर करत असतील तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचे काम एक ते दोन दिवसांत करू शकतो, असा इशारा शरद पवारांनी दिला. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी काही प्रश्न मांडले त्यांना जेलमध्ये टाकले. अरविंद केजरीवाल हे चांगले काम करतात. त्यांनी मोदींचे धोरण योग्य नाही अशी टीका केली. त्यांना जेलमध्ये टाकले. लोकांच्या प्रतिनिधाला असे जेलमध्ये टाकणे योग्य नाही, असे देखील पवार म्हणाले.

परत येणार...

शरद पवार इंदापूरमध्ये सभा घेत होते. शरद पवारांचा आवाज बसला होता. बोलताना त्यांना त्रास होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, शरद पवारांनी या परिस्थितीतही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आपले भाषण संपवताना आपला घसा बसला आहे. आपण येथे परत येऊ असा शब्द ही पवारांनी आपल्या भाषणात दिलाय.

Sharad Pawar
Latur Lok Sabha Election : 'लातूरकरांच्या हक्काचं पाणी देशमुखांनी पळवलं'; निलंगेकर पाटलांनी डिवचंल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com