Baramati News, 03 Oct : लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यात चांगलाच बदल झाला आहे. अजितदादांनी आपल्या जॅकेटपासून बोलण्यापर्यंत सर्व गोष्टीत बदल केला आहे.
याआधी रोखठोक वक्तव्य आणि टीका करणारे अजित पवार आता खूप जपून बोलताना दिसतात. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या बदललेल्या स्वभावाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. अशातच आता खुद्द दादांनीच मी बदललो आहे ना? असं बारामतीकरांना विचारलं आहे.
बारामतीतील (Baramati) बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजितदादा म्हणाले, "जनसन्मान यात्रा सुरु झाल्यापासूनच मी कोणावरही टीका करायची नाही, कोणाविषयी काहीही बोलायचे नाही असं ठरवलं आहे. मी नम्र झालो, कोणावरही चिडत नाही, तुम्हाला आता हसणारा अजित पवार दिसतोय ना?" असं म्हणत त्यांनी आपण बदललो असल्याचं जाहीरपणे सांगितलं.
शिवाय यावेळी अजित पवारांनी मी कोणावरही टीका करत नाही त्याप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही कुणावर टीका करू नये असा सल्ला दिला. ते म्हणाले, "मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण केलेली विकासकामे खूप आहेत, त्यामुळे ती कामेच लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना, अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्या मुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा."
दरम्यान, यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिला संदर्भात केलेले वक्तव्य अयोग्य असून त्याबाबत भुयार यांना दिलगीरी व्यक्त करण्याबाबतची सूचना दिली असून इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी, असं सांगितलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय भुयार यांनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा होता असंही सांगितलं.
तरीही मी त्यांना चूक दुरुस्त करायला सांगितल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी 35 हजार कोटींची तरतूद केल्यामुळे या योजनेत कोणतीही अडचण येणार नसल्याची माहिती अजितदादांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.