Ram Satpute vs Praniti Shinde : ''इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर, तेरी जीत से ज्यादा चर्चे तो..'' ; राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला!

Solapur Lok Sabha Constituency Election : 'पराभव पचवता आला पाहिजे. तसा विजय सुद्धा पचवता आला पाहिजे, मात्र त्यांना विजय पचवता येत नाही.' असंही राम सातपुतेंनी म्हटलं आहे.
Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde-Ram SatputeSarkarnama

Ram Satpute and Solapur Lok Sabha Constituency Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पराभूत उमेदवार आणि भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज सोलापूरमधील जनतेचे आणि निवडणुकीत काम केलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत, त्यांचे आभार व्यक्त केले.

तसेच यावेळी मीडियाला प्रतिक्रिया देताना त्यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकाही केली आणि त्यांना टोलाही लगावल्याचे दिसून आले.

मीडियाशी बोलताना आमदार राम सातपुते(Ram Satupate) म्हणाले, 'सर्वप्रथम मी सोलापूरच्या जनतेचे धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्याप्रमाणावर त्यांनी आम्हाला मतदान केलं. आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापुरच्या जनतेशी जे ऋणानुबंध आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर जे मतदान मला केलं गेलं.

भाजप आणि महायुतीला झालं. त्यामुळे आज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मी आलेलो आहे. आम्ही भाजपचे कार्यकरत्ते पराभवातून खूप काही शिकत असतो. त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन याठिकाणी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत जे काम केलं आहेत. त्या कामाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे.'

Praniti Shinde-Ram Satpute
Ram Satpute : सोलापुरातील पराभवाने घायाळ राम सातपुते करणार प्रणिती शिंदे अन्‌ काँग्रेसवर हल्लाबोल?

तसेच, 'पराभव हा पचवता आला पाहिजे. तसा विजय सुद्धा पचवता आला पाहीजे. त्यांना विजय पचवता येत नाहीए, अहंकार आणि त्यामधून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे. मला असं वाटतं की सोलापूरकरांना जो विकास हवाय तो कधीही त्या करणार नाहीत आणि इथल्या जनतेचे प्रश्न कधीच त्या सोडवणार नाहीत. केवळ स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची त्या दिशाभूल करतील. आपण कसा उमेदवार निवडून दिला हे सोलापूरकर पाहातील.' असं सातपुतेंनी म्हटलं.

याशिवाय खासदार प्रणिती शिंदे(Praniti Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांचा चंपा असा उल्लेख केल्याचं समोर आलं होतं, यावरूनही सातपुते यांनी टीका केली. 'चंद्रकांतदादांबद्दल ज्या अपमानस्पद पद्धतीने त्या बोललेल्या आहेत. याचा मी सर्वप्रथम मी निषेध करतो.

चंद्रकांतदादांच्या वयाचा त्यांनी विचार करायला हवा होता. एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहत आहेत. येत्या काळात ज्या पद्धतीची त्या भाषा वापरत आहेत, स्टंटबाजी करत आहेत, ज्या पद्धतीने त्या वागत आहेत. ते सर्व इथला कार्यकर्ता आणि जनता पाहत आहे.' असं सातपुते यांनी बोलून दाखवलं.

Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde : ‘मैं प्रणिती सुशीलकुमार शिंदे...’ : संविधान हाती घेत प्रणितींनी घेतली हिंदीतून खासदारकीची शपथ

याचबरोबर 'सोलापूरकरांना एकच सांगेन की येत्या काळात विकास आणि इथल्या प्रश्नाबद्दल इथले खासदार कधी काही करतील की नाही, याबद्दल शंका आहे. कारण स्टंटबाजी करणं हा त्यांचा स्वभाव आहे. सोलापूरकर ते अनुभवत आहेत.

हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, असं मी माझ्यासाठी म्हणालो होतो. पण समजने वालो को इशारा काफी होता है. इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर, तेरे जीत से जादा मेरे हार के चर्चे है. हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो.' असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंना टोला लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com