Baramati Politics : 'पडळकर म्हणजे भाजपच्या दावणीला बांधलेला भुंकणारा कुत्रा'

गोपीचंद पडळकरांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टिका केली होती.
Baramati Politics
Baramati Politics

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हे भाजपच्या (BJP) दावणीला बांधलेला भुंकणारा कुत्रा असून देशाचे नेते शरद पवार व त्यांच्या कुटुंबियांविषयी बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी सडकून टीका माजी आमदार जयवंत जाधव यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टिका केली होती. या टिकेचा माजी आमदार जयवंत जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपने आपलं अपयश झाकण्यासाठी अनेक भुंकणारे कुत्रे आपल्या दावणीला बांधले आहे. त्यापैकी एक पडळकर आहे. लायकी नसताना आमदारकी भूषवित असलेल्या पडळकर याची पवार साहेबांवर बोलण्याइतकी औकात नाही. असे अनेक भुंकणारे कुत्रे पक्षाच्या नेतृत्वाबाबत भुंकतात. हे कुत्रे प्रसिध्दी मिळविण्यासाठी असे वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया माजी आमदार जयवंतराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Baramati Politics
Beed Politics : उसणवारीवरील पालकमंत्र्यांमुळे बीड जिल्हा उघड्यावर...

तसेच, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनीही गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. पडळकांच्या टिकेतील शब्दच त्यांना फिरवत चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पडळकरांना स्वत: चं काही डोकं आहे का, चोऱ्या माऱ्या करुन, मंगळसुत्र चोरी करुन तो आमदार झाला आहे. बारामतीच्या विरोधात भुंकण्यासाठीच त्यांना हे पद दिलं आहे, असा हल्लाबोल चव्हणा यांनी केला आहे. इतकचं नव्हे तर काही झालं की पाकिस्तानचा विषय खोदून काढायचा, पण तिकडे चीनने भारताचा एवढा भुभाग खाऊन टाकला त्यावर कोणी बोलायला तयार नाही. अहिल्याबाई होळकर यांचं जे मंदिर बांधलं त्यांच्याबद्दल पडळकरांना माहिती तरी आहे का, नसेल तर माहिती करुन घ्या आणि तुम्ही अशी मंदिरं पाडायचा विचार केला तर आम्ही तो खपवून घेणार नाही, असा इशाराही विद्या चव्हाण यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com