Dhananjay Deshmukh : 'घरी बसून न्याय मिळत नाही...'; वैष्णवीच्या आई -वडिलांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांचं मोठं विधान

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी कस्पटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. सोमवारी (ता.26) देखील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
Vaishnavi Hagawane case  (1).jpg
Vaishnavi Hagawane case (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी कस्पटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. सोमवारी (ता.26) देखील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

या भेटीनंतर माध्यमंशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, आमचं दुखणं एवढं मोठं आहे त्यामुळे यांच्या दुःखाची आम्हाला कल्पना आहे. दुःख सहन करत पुढे कशी वाटचाल करावी लागते याविषयी मी त्यांच्याशी चर्चा केली.

आमचं दुःख आणि त्यांचा दुःख काही वेगळं नाही. घरातला माणूस सोडून जात असेल तर ते भोग आहेत. ते कुणाच्याच नशिबी येऊ नये. त्यांना भेटायला येणाऱ्या सगळ्या लोकांनी या काका-काकूंसोबत एक नऊ महिन्याचं बाळ आहे. त्यामुळे या दुःखातून कसं सावरायचं याचं बळ त्यांना द्यावं अस देशमुख म्हणाले.

Vaishnavi Hagawane case  (1).jpg
Ajit Pawar News : अशोक डक यांना भाजपात जाण्यापासून रोखण्यासाठी अजित पवारांच्या कार्यालयातून फोन!

आम्ही देखील त्याच परिस्थितीतून जात आहोत, कस्पटे कुटुंबीय सुद्धा त्याच परिस्थितीमधून जात आहे. दुःख कधी कुणाचं कमी होत नसतं हे सगळे भोग आपल्याला भोगावे लागतात. आपण काय इतकं पाप केलं होतं. या सगळ्या गोष्टी आपल्या भोगाला आल्या, याचा विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायला ईश्वराने त्यांना बळ द्यावं अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.

जे पीडित कुटुंब आहेत मग ते देशमुख कुटुंब असो किंवा कासप्टें कुटुंब असो दुःख तर झालेला आहे. आपले दोन माणसं आपल्याला सोडून गेलेले आहेत. मात्र परीक्षा तर याच्यापुढे आहेत न्यायालयाची पायरी चढताना आपल्याला सगळं सिद्ध करायचं आहे. त्याच्यातूनच आपल्याला न्यायाची अपेक्षा करावी लागेल आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला अहिंसेच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने योग्य दिशा कशी शोधता येईल हे पाहिले पाहिजे,असंही धनंजय देशमुख म्हणाले.

Vaishnavi Hagawane case  (1).jpg
Gopichand Padalkar : स्थानिकच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? 'हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना...'

कारण घरी बसून आपल्याला न्याय मिळत नाही न्याय मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर जावा लागत उपोषण आंदोलन करावा लागते, असं धनंजय देशमुख म्हणाले.

या सगळ्या परिस्थितीतून माझं गाव माझा कुटुंब माझे सगळे जाती धर्मातील लोक गेलेले आहेत. माझ्या भावाने किंवा वैष्णवी ताईने काय पाप केलं होतं की, त्यांना कायमचं आपल्या लेकरांना आणि कुटुंबाला सोडून जावं लागलं. न्याय मागण्यासाठी आपल्याला त्या प्रक्रियेत यावा लागेल आणि न्याय घ्यावा लागेल,असंही देशमुख यावेळी म्हणाले.

वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane) (वय वर्षे 23) हिने सासरच्या जाचाला कंटाळून 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर, फरार असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांनाही पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com