भाजपच्या हक्काच्या प्रभागात हेवीवेट नगरसेवकांत आताच युद्ध!

आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील इच्छुकांनी काय करायचे, याचा गुंताही धीरज घाटेंच्या प्रभागातील 'एन्ट्री'ने वाढविला आहे.
 Dhiraj Ghate & Hemant Rasne
Dhiraj Ghate & Hemant RasneSarkarnama

पुणे : नव्या प्रभागामुळे 'हेवी वेट' नेत्यांपुढे अडचणी उभा केलेल्या अणि भाजपमधील (BJP) हेडमास्तर खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांचे 'होमपिच' असलेल्या शनिवारपेठ- राजेंद्रनगर (प्रभाग १७) कोणाला मिळणार या गंभीर चर्चा सुरू असतानाच माजी सभागृहनेते, नगरसेवक धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी बुधवारीच (ता.2 फेब्रुवारी) प्रभाग फिरून हा प्रभाग आपलाच असल्याचे जाहीर केले. त्यावरून याच प्रभागातील विद्यामान नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) कुठे जाणार, याकडे लक्ष लागले. तर नगरसेवक राजेश येनपुरे यांच्यासह भाजयुमोचे शहराध्यक्ष बापू मानकर, (Bapu Mankar) प्रमोद कोंढरे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील इच्छुकांनी काय करायचे, याचा गुंताही धीरज घाटेंच्या या प्रभागातील 'एन्ट्री'ने वाढविला.

 Dhiraj Ghate & Hemant Rasne
भाजपचे ‘ते’ नगरसेवक गटाचा प्रस्ताव देऊन झाले नॉट रिचेबल, फडणवीसांकडे झाली तक्रार...

टिळक, रासने, येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके यांचा सदाशिव-नारायण पेठ आणि घाटेंच्या नवीपेठ या प्रभागातील काही भागांना जोडून शनिवार पेठ-राजेंद्रनगर हा नवा प्रभाग आकारला आहे. त्यामुळे हमखास जिंकण्याची आशा असलेल्या भाजपच्या डझनभर इच्छुकांची चिंता वाढली आहे. रासने यांच्यासह घाटे, मानकर, येनपुरे, कोंढरे, काळोखे या जुन्यासोबत काही नव्या दमाच्या इच्छुकांचा या 'सेफ' प्रभागावर डोळा होता. परंतु, दोन्ही प्रभागाची अशा प्रकारे विभागणी करून भलताच प्रभाग केल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

कसबा विधानसभा लढण्याची फिल्डिंग लावलेल्या रासने, घाटेंच्या चिंतेत भर पडू शकते, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. परंतु, जुन्या जाणत्या नगरसेवकांनी हा भाग सोडून नवा प्रभाग सोडावा, ज्यामुळे नव्या चांगली संधी मिळेल, असे नवे इच्छुक उघडपणे सांगत आहेत. हे दोन टर्म निवडून आले आणि सत्तेत राहून पदे घेतलेल्यांना इतर प्रभागांत फारशा अडचणी येणार नसल्याचाही सल्लाही ते देत आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याआधी या प्रभागात तिकिटासाठीच भाजपमध्ये लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 Dhiraj Ghate & Hemant Rasne
जिल्हाधिकाऱ्यांनी झुगारला राष्ट्रवादीचा दबाव : सरपंचांसह ५ जणांवर अपात्रतेची कारवाई

महिला इच्छुकांनाही अशाच अडचणींचा सामान करावा लागणार असल्याचे दिसत आहे. याच प्रभागातून गायत्री खडके आणि बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापटही लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याशिवाय काही महिलांची नावे इच्छुकांच्या यादीत येऊ शकतात. त्यामुळे याच प्रभागात तिकिटाचा गोंधळ उडणार असल्याचे स्पष्ट आहे. या नव्या प्रभागात राजेंद्रनगर, रमणबाग शाळा, सदाशिव पेठ, लोकमान्य नगर, दगडूशेठ मंदीर, नारायण पेठ, गांजवे चौक हा परिसर राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com