Pune Bhide Wada Demolished News : भिडे वाडा रातोरात जमीनदोस्त; मोठ्या पोलिस बंदोबस्तात पालिकेची कारवाई...

Pune Bhide Wada PMC Action : आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे.
Pune Bhidewada Demolished News
Pune Bhidewada Demolished News sarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशातील मुलींची पहिली शाळा जेथे सुरू झाली होती त्या भिडे वाड्याचा ताबा आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेल आहे. पालिकेकडून हा वाडा जमीनदोस्त केला गेला आहे. मागील महिन्यात सर्व भाडेकरुंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली अन् भिडे वाडा पालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला. आज मध्यरात्री पालिकेने पोलिस बंदोबस्तात ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही सर्व प्रक्रिया केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे. (Latest Marathi News)

Pune Bhidewada Demolished News
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर ; सावित्रीबाई फुले बदनामी प्रकरणी पोलीस..

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांनी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठ परिसरात देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. तोच भिडे वाडा आता महानगर पालिकेने ताब्यात घेतला गेला आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षे काही भाडेकरु आणि दुकानदार वास्तव्यास होते. दुकानदार आणि भाडेकरू यांचा येथील जागेवरून वाद सुरू होता. अखेर १३ वर्षांनंतर या प्रकरणी आता न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे.

महानगरपालिका आणि पोलिस दल रात्री या ठिकाणी पोहचले होते. संपूर्ण भिडे वाडा महापालिकेने ताब्यात घेतला आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, "पुणे पोलिसांकडून आम्हाला संपूर्ण परवानगी मिळाली आहे. ही इमारत धोकादायक असल्यामुळे येथील जागा मोकळी करून ते पाडण्याचं काम सुरू आहे. याबाबत पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. येथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांचं समुपदेशन पोलिसांनी केलेलं आहे. आणि पोलिसांच्या माहितीनुसार त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे."

Pune Bhidewada Demolished News
Rajasthan Assembly Results 2023 : भाजपने बहुमताचा आकडा गाठला; राज्यवर्धन सिंह राठोड पिछाडीवर, पायलट आघाडीवर

भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अशी होती -

- शिवाजी रस्ता आणि परिसरातील वाहतूकीला मज्जाव केला.

- फूटपाथनरील पालिकेचे दिवे, फलक हटवण्यात आले.

- वाड्यावर असलेले जाहीराती-माहितीफलक, पाट्या हटवण्यात आले.

- जेसीबीने वाडा दुकानाच्या पाट्या हटवताना वाड्याचा थोडा भाग पडला.

- जीर्ण आणि पडत आलेला वाडा दोन जेसीबी लावून पाडायचे काम सुरू झाले .

- राडारोडा उचलण्याचं काम सुरू करण्यात आले.

राष्ट्रीय स्मारक होणार -

भिडे वाड्याच्या जागेवर आता राष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत तीन वास्तुविशारदांकडे यासाठी काम करावयाचे नियोजन देण्यात आल्याचे समजते. लवकरच स्मारकाच्या कामाचं भूमीपूजन करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com