Telangana Assembly Election : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, तेलंगणाचे पोलिस महासंचालक निलंबित; रेवंथ रेड्डींची भेट भोवली

Telangana Assembly Results in Marathi : निवडणूक आयोगाने थेट पोलिस महासंचालकांवर कारवाई केली आहे.
Telangana Assembly Elections
Telangana Assembly ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Telangana Assembly Elections Results in Marathi : आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणामध्ये मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांना निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने अंजनी कुमार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीवरून वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली आहे.

Telangana Assembly Elections
Revanth Reddy Lost : रेवंथ रेड्डींचा कोडंगलमधून मोठा विजय; तर कामारेड्डीतून पराभव

तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांनी राज्य पोलिस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल अधिकारी महेश भागवत यांच्यासोबत हैदराबादमध्ये विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डीजीपी अंजनी कुमार यांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला.

रेवंथ रेड्डींच्या भेटीनंतर आयोगाची कारवाई

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना डीजीपींनी ही भेट घेतली. या भेटीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला, पण तेलंगणामध्ये काँग्रेसला दिला मिळाला असून, काँग्रेसची वाटचाल बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणामधील मतमोजणीत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लागलेल्या निकालात २९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. ३५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस विजयी होत असल्याचे पाहून पक्षाचे समर्थक प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना शुभेच्छा देत आहेत. याच दरम्यान डीजीपी रेवंथ रेड्डी यांनी घेतलेली भेट चर्चेत आली आहे.

तेलंगणा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएसला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. ही बातमी होईपर्यंत बीआरएसने १७ जागा जिंकल्या होत्या, तर २२ जागांवर बीआरएस आघाडीवर होती.

Telangana Assembly Elections
Telangana Chhattisgarh Assembly Results : बीआरएसच्या गडाला सुरुंग; काँग्रेसनं तेलंगणा खेचलं; छत्तीसगडची सत्ता गमावली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com