Maratha Reservation : 'ओबीसी'तून आरक्षण हवं हा हट्ट कशासाठी? - भूषणसिंहराजे होळकरांचा सवाल!

Bhushan Singh Raje Holkar : मराठा समाजास सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असंही म्हणाले आहेत.
Bhushan Singh Raje Holkar
Bhushan Singh Raje HolkarSarkrnama
Published on
Updated on

Pune News : ''मराठा आणि ओबीसी हे भाऊभाऊ आहेत राज्यातील आजची परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण दिले गेलेच पाहिजे,आरक्षणाची मर्यादा वाढवून नक्कीच मिळू शकते पण ओबीसी प्रवर्गातून हवं हा हट्ट कशासाठी?'' असा सवाल होळकर घराण्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी केला.

किल्ले वाफगावच्या संवर्धन कार्यासाठी सरकारकडून 7.20 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्याचे कंत्राट झाले आहे. 6 जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्यभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. त्याचे औचित्य साधत किल्याच्या संवर्धन कामाचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकारपरिषदेत भूषणसिंहराजे होळकर यांनी दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांवर मराठा आरक्षण(Maratha Reservation) विषयी त्यांनी भूमिका मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना होळकर म्हणाले, ''आजची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे बिहार झाल्यासारखे वाटते आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा नेते मंडळी धुळीस मिळवत आहेत. एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत वक्तव्य केले जात आहेत. हे चुकीचे आहे.''

तसेच, ''पुरोगामी विचार धारेवर चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. महाराष्ट्रातील सामाजिक वीण बिघडवू नका, ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ नये, प्रत्येक वंचित घटकास न्याय मिळावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.'' असं ते म्हणाले.

Bhushan Singh Raje Holkar
Chandrapur : ओबीसी बचाव परिषदेतील ठरावांवर फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकले...

याशिवाय, ''मराठा समाजास सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल, एकाही ओबीसीला राजकीय पद मिळवू शकणार नाही. राजकीय आरक्षण वगळता शैक्षणिक आणि नौकरी आरक्षण दिले गेले पाहिजे, माझा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही पण सामाजीक दरी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.'' असे मत होळकर यांनी व्यक्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com