जुन्नरमधील बिबट सफरी बारामतीला जाऊ देणार नाही : अजितदादांच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित बिबट्या सफारी वरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेमध्ये (shivsena) वाद रंगला आहे.
shivsena, ncp
shivsena, ncpsarkarnama
Published on
Updated on

पुणे : जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित बिबट्या सफारी अन्यत्र स्थलांतरीत होणे हे स्थानिक आमदारांचे अपयश आहे. बारामतीला होणाऱ्या सफारीला आमचा विरोध नाही. मात्र, ज्याठिकाणी बिबट्या समस्या आहे आणि सफारीसाठी पोषक वातावरण आहे. अशा जुन्नरमध्येच सफारी होणे आवश्‍यक आहे. अशी भूमिका पुणे शिवसेना (ShivSena) संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. तर जुन्नर सफारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही अहिर यांनी सांगितले.

shivsena, ncp
"फडणवीसांना यापूर्वी ६ वेळा नोटीस, दंग्याची गरज नाही"; गृहमंत्र्यांनी भाजपला सुनावले

'सरकारनामा'च्या प्रतिनिधीशी संपर्क साधत अहिर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, जुन्नर तालुक्यात बिबट्या समस्येची दखल जागतीक पातळीवर घेण्यात आली आहे. समस्या कमी करण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारीची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणी केली. मात्र, हा प्रकल्प रेंगाळला होता. मुख्यमंत्री हेच वनमंत्री असल्याने त्यांच्याकडे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबतची माहिती देऊन, हा प्रकल्प जुन्नरला व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. तर असे विकास प्रकल्प अन्यत्र जाऊ नयेत यासाठी आमदार अतुल बेनके यांनी महाविकास आघाडी म्हणुन शरद सोनवणे यांच्या पाठिशी राहिले पाहिजे, असेही अहिर यांनी सांगितले.

दरम्यान, राज्याच्या नुकत्याच अर्थसंकल्पात पुणे वन विभागाअंतर्गत बारामती येथे बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूदीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत, बिबट्या सफारी जुन्नर येथेच, व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातुन होऊ लागली आहे. यामुळे आता सचिन अहिर यांनी घेतलेल्या पुढाकाराने बिबट सफारीच्या जुन्नरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

shivsena, ncp
फडणवीसांच्या नोटिसीवरुन अजितदादा उद्विग्न; राजकीय नेत्यांना कानपिचक्या

लवकरच आदित्य ठाकरे यांचा जुन्नर दौरा

जुन्नर तालुक्याला २१ मार्च २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, पर्यटन विकासासाठी अद्याप कोणताही अर्थसंकल्पीय तरतूद झालेली नाही. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संपुर्ण एक दिवस तालुक्यात दौरा करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. या मागणीच्या पार्श्‍वभुमिवर अधिवेशन संपले कि ठाकरे यांचा दौरा नियोजित केला जाईल, असेही अहिर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com