Pune ACB News : पुणे 'एसीबी'ची मोठी कारवाई; एकाच दिवशी दोन ट्रॅप, तीन लाचखोर जाळ्यात

Anti Corruption Buerau Action News : एफआयआर न करण्यासाठी पोलिस चौकीतच जमादाराने महिलेकडून घेतली २५ हजार रुपयांची लाच
Bribe News :
Bribe News :Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : आठ दिवसांतच पुणे एसीबीने बुधवारी (ता.१८) आणखी दोन ट्रॅ्प करून तीन लाचखोरांना दणका दिला.याअगोदर नऊ ऑक्टोबरला त्यांनी सहकारी संस्था,केडगावचा (ता.पुरंदर) डेप्यूटी ऑडिटर रविंद्र ज्ञानेश्वर गाडे (वय ५१) याला सासवड येथील तहसीलदार कचेरीसमोर साडेआठ हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

तर,पहिल्या घटनेत पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यातील सहाय्क फौजदार (जमादार) सुनील शहाजी जाधव (वय 49) याला पिंपळे सौदागर पोलिस चौकीतच २५ हजाराची लाच एका ४५ वर्षीय महिलेकडून घेताना त्यांनी रंगेहात पकडले.(Crime News)

Bribe News :
Pune Crime News|धक्कादायक! येरवडा कारागृहातील कैद्याकडे चरस आढळले; पोलिसांकडून तपास सुरू

जाधवने साठ हजार रुपयांची लाच मागितली होती.नंतर पन्नास हजारावर तडजोड केली. त्यातील पहिला इन्स्टॉलमेंट घेताना तो पकडला गेला.तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे चालू होते. हे काम कराळे नावाचा कॉन्ट्रॅक्ट्रर करीत होता. मात्र,त्याने ते करारानुसार वेळेत पूर्ण केले नाही.म्हणून त्याचे बांधकामाचे साहित्य या महिलेने अडवून ठेवले. काम झाल्यावर ते देईल,असे त्या म्हणाल्या.(Anti Corruption Buerau Action)

त्यामुळे कराळेंनी या महिलेविरोधात सांगवी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करुन कारवाई न करण्यासाठी जाधवने या महिलेकडे लाच मागितली होती. त्यानुसार एसीबीच्या पीआय प्रणेता प्रणेता सांगोलकर आणि त्यांचे पथक प्रवीण तावरे,कोमल शेटे,सौरभ महाशब्दे, चव्हाण यांनी हा ट्रॅप केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे एसीबीचा दुसरा ट्रॅप दौंड नगरपरिषद कार्यालयात झाला. त्यात परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा अभियंता विजय दिगंबर नाळे (वय 27) आणि प्रकल्प सल्लागार प्रशांत मधुकर जगताप (वय31) यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यातील ५२ वर्षीय तक्रारदाराचा प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाच्या रकमेचा चेक काढण्यासाठी नाळे याने पन्नास हजार रुपये लाच मागितली होती.

नंतर तीस हजारावर तडजोड करून त्यातील दहा हजार रुपये त्याने अगोदरच घेतले. लाचेचा दुसरा दहा हजाराचा हफ्ता घेताना एसीबीचे पीआय वीरनाथ माने आणि त्यांचे पथक रियाज शेख,यांनी त्याला बुधवारी पकडले.त्याला ही लाच(Bribe Case) घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने जगतापलाही या गुन्ह्यात आरोपी करून त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Bribe News :
Vijay Wadettiwar - CM Shinde Meeting : सर्वात मोठी बातमी ! विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com