Video : पंतप्रधान मोदींना आपला ताफा का थांबवावा लागला?

Narendra Modi : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चक्कं नरेंद्र मोदींचा ताफा भर रस्त्यामध्ये थांबवावा लागला होता.
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी 29 हजार कोटींची भेट घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधानांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान पीएम मोदींची संवेदनशीलता पाहायला मिळाली. अहमदाबादहून गांधीनगरला जाताना पंतप्रधानांना रुग्णवाहिका दिसली तेव्हा, रुग्णवाहिकाकेला रस्ता देण्यासाठी त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला.

PM Narendra Modi Latest Marathi News
Navneet Rana : बच्चू कडूंनी स्वत:वर नियंत्रण राखावं : राणांनी दिला सल्ला

यापूर्वीसुद्धा दिल्लीच्या सीमाभागात शेतकऱ्यांचे आंदोलनादरम्यान (PM Narendra Modi) चक्कं नरेंद्र मोदींचा ताफा भर रस्त्यामध्ये थांबवावा लागला होता. कृषी विषयकांच्या कायद्यांचा निर्णय घेतल्याने आंदोलक शेतकऱ्यांच्या असंतोषाला मोदींना सामोरे जावे लागले. यावेळी मात्र मोदींनी स्वत:च आपला ताफा थांबवले आहे. रुग्णवाहिकेला (Ambulance) मार्ग देण्यासाठी मोदींनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. अहमदाबादहून ते गांधीनगरच्या दरम्यान हा प्रसंग घडला. रुग्णवाहिका मार्गस्थ झाल्यावरच मोंदीचा ताफा पुढे सरकला. पुढेही सरकला गेला.

PM Narendra Modi Latest Marathi News
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार तिरंगी : झारखंडचा दिग्गज नेता मैदानात!

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "लोकांचे सरकार. गांधीनगरहून अहमदाबादला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी थांबला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com