प्रभाग रचनेत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हस्तक्षेप, भाजप हरकत घेणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) प्रभागरचना निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केली आहे.
Laxman Jagtap, Mahesh Landge
Laxman Jagtap, Mahesh LandgeSarkarnama

पिंपरी : अनेकांचा जीव टांगणीस लावलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) प्रभागरचना अखेर मंगळवारी (ता.१ जानेवारी) निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यावर पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपची (BJP) आली. ही प्रभागरचना आमच्यासाठी अनुकूल आहे, असे या पक्षाच्या आजी, माजी शहराध्यक्ष आमदारांनी सांगितले. तर, प्रभागरचना कशीही असो, भाजपच्या भ्रष्टाचारामुळे जनता प्रचंड वैतागली असल्यामुळे आम्हीच जिंकणार असल्याचा दावा विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) केला. तर, शिवसेना (Shivsena) कॉंग्रेस (Congress) आणि मनसेशी (MNS) संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रभागरचना अनुकूल की प्रतिकूल हे भाष्य करण्यात आले नाही.

Laxman Jagtap, Mahesh Landge
नवी प्रभागरचना राष्ट्रवादीला अनुकूल : भोसरीत मोठा; तर चिंचवडमध्ये लहान प्रभाग

दरम्यान, प्रभागरचना फक्त प्रसिद्ध झाली आहे. ती अंतिम होण्यास २६ तारीख उजाडणार आहे. कारण त्यावर हरकती व आक्षेप, सुचनांसाठी १४ दिवस देण्यात आले आहेत. त्यानंतर सुनावणी होऊन तिला अंतिम स्वरुप मिळणार आहे. तरीही ती

भाजपासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत (PCMC Election-2022) सत्ताधारी भाजपाचे पूर्वीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच, तीन-चार ठिकाणी प्रभाग रचनेबाबत कायदेशीर हरकती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा दावा भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष अनुक्रमे आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी केला आहे.

Laxman Jagtap, Mahesh Landge
आमदार नितेश राणेंना मोठा धक्का; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

याबाबत भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष लांडगे म्हणाले, गतवेळी चार सदस्यीय प्रभाग पद्धत होती. त्यावेळी पक्षाला ७७ जागा मिळाल्या. आता तीन सदस्यीय प्रभागरचनेत पक्ष गतवेळीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. तीन-चार ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करुन प्रभाग रचना असंवैधानिकपद्धतीने केल्याचे लक्षात आले आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेवून हरकती घेणार आहोत. राज्यातील मविआ सरकारचा कारभार हा निष्क्रीयतेचा आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी गेल्या अडीच वर्षांत त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मविआ विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होणार आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही गेल्या पाच वर्षांत शहरात ठेवली. त्याला मतदार समर्थन देतील आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावाही लांडगेंनी केला.

तर, जगताप म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाने चांगले काम केले आहे. पक्षाचे पदाधिकारी, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रत्येक प्रभागात दोन-तीन इच्छुक आणि प्रभावी उमेदवार केवळ भाजपकडे आहेत. विरोधी पक्षाकडे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारही नाही. त्यामुळे निश्चितपणाने केलेल्या कामाचाच जोरावर पक्ष चांगले यश मिळवणार आहे.

Laxman Jagtap, Mahesh Landge
Budget : देशाला वेगाने प्रगतीकडे नेणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचे अभिनंदन..

तर, प्रभागरचना कशीही होऊ द्या. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे जनता वैतागलेली आहे. त्यामुळे ती या निवडणुकीत भाजपला जागा दाखवणार आहे. सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच त्यांचे तत्व व समीकरण राहिलेले आहे. त्यामुळे आता सपत्ता आमचीच येणार आहे, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व शहर सरचिटणीस फजल शेख यांनी सांगितले. दरम्यान, जाहीर झालेल्या प्रभागरचनेवर नगरसेवक, इच्छूक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून फीडबॅक घेण्यास सुरवात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर दोन दिवसांत त्यावर आक्षेप तथा हरकती घेऊ, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com