Pimpri-Chinchwad BJP: भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; कार्यकारिणीची बैठक घेत दिला 'हा' आदेश

Shankar Jagtap : भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष शंकर जगताप यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.
Pimpri-Chinchwad BJP
Pimpri-Chinchwad BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष शंकर जगताप यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यानंतर या कार्यकारिणीची पहिली बैठक शंकर जगतापांनी शनिवारी शहर पक्ष कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी आगामी सर्व निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

भुतकाळातील गोष्टी विसरून नव्या विचारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांचा सन्मान राखून संघटना बळकटीसाठी जोमाने कामाला लागा, पक्षात काम करताना सर्वांनी एकमेकांशी संवाद साधा, असा मोलाचा सल्ला जगतापांनी यावेळी दिला. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्ष कार्यालयात सूचना पेटी लावण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

Pimpri-Chinchwad BJP
Yerawada Central Jail : काय सांगता! येरवडा कारागृह प्रशासनाला चक्क कैद्यानेच 'असा' घातला २७ लाखांचा गंडा...

यावेळी महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करण्यात आले. तसेच मोदींच्या वाढदिवसानिमित्तच्या सेवा पंधरवड्यात घेण्यात आलेल्या उपक्रमांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यास पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्षांनी सांगितले.

शहरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक भाजपचे समर्थन करीत असल्याचा दावा करीत त्यांची कामे कुठे अडणार नाहीत, याची काळजी घेण्यास जगतापांनी सांगितले. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगतापांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी पक्षाच्या शहर प्रभारी वर्षा दहाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Pimpri-Chinchwad BJP
Sambhaji Patil Nilangekar : आमदार निलंगेकरांच्या रॅलीला दाखवले काळे झेंडे; जलसाक्षरता रॅली दरम्यान उडाला गोंधळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com