Yerawada Central Jail : काय सांगता! येरवडा कारागृह प्रशासनाला चक्क कैद्यानेच 'असा' घातला २७ लाखांचा गंडा...

Prisoner Froud in Yarwada Jail : मनी ऑर्डर पुस्तिकेत केला फेरफार
Yerawada Central Jail
Yerawada Central JailSarkarnama
Published on
Updated on

Pune News : येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याने मनी ऑर्डर पुस्तिकेत बनावट सहीद्वारे फेरफार करून २६ लाख ६९ हजार ९११ हजार रुपयांचा अपहार केला. मनी ऑर्डर आलेली नसताना त्याने पैसे जमा आहेत, असे दाखवून ते पैसे कारागृहातील कॅन्टीनमध्ये खर्च केले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी संबंधित कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Political News)

सचिन रघुनाथ फुलसुंदर (सध्या रा. येरवडा कारागृह, मूळ रा. जुन्नर) असे कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृह अधिकारी बाबूराव मोटे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे. फुलसुंदरवर बलात्कार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. (Maharashtra Political News)

Yerawada Central Jail
Ram Shinde Vs Rohit Pawar : अजितदादांपूर्वीच रोहित पवारांनीच बांधले होते गुडघ्याला बांशिंग? राम शिंदेंच्या विधानाने खळबळ

शिक्षा भोगत असताना फुलसुंदरने कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर विक्रीस पाठविण्याचा बहाणा करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याने मनी ऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत कारागृह अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, बनावट हिशेब, तसेच अन्य कैद्यांची बनावट सही करून फेरफार करण्यास सुरुवात केली. या अफरातफरीतून त्याने येरवडा प्रशासनाला लाखोंचा गंडा घातला. (Pune News)

कारागृहात मनी ऑर्डर

याबाबत येरवडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक काटेंनी सांगितले, काही कैद्यांचे नातेवाईक कैद्यांच्या खर्चासाठी मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवतात. ते पैसे कैदी कॅन्टीनमध्ये काही वस्तू घेण्यासाठी वापरतात. कैद्यांची मनी ऑर्डर आल्यानंतर कारगृह प्रशासन ते पैसे स्वीकारते व त्यांची पुस्तिकेत नोंदणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक कैद्यांचे खाते तयार केले जाते. त्यांच्या खात्यावर जमा असलेले पैसे कैदी वापरू शकतात.

असा घातला गंडा?

फुलसुंदर याने मनी ऑर्डर आलेले नसताना स्वतःच्या आणि इतर कैद्यांच्या नावे पैसे आले आहेत, अशी नोंद पुस्तिकेत केली. अशा प्रकारे त्याने एकूण २६ लाख ६९ हजार रुपयांच्या नोंदी केल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे फुलसुंदर आणि त्यांच्या साथीदारांनी कॅन्टीनमधून विविध वस्तू घेतल्या. खाद्यपदार्थ व कपडे अशा बाबींवर त्याने हे पैसे खर्च केले आहेत. हा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Yerawada Central Jail
Amit Shah News : मुंबईतून अमित शाहांचा खळबळजनक दावा; म्हणाले, " २०१४ पर्यंत देशातील ६० टक्के लोकं हे..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com