भाजपने दिली आमदार लक्ष्मण जगतापांच्या बंधूंकडे मोठी जबाबदारी

आगामी महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीत काल (ता.२५) निश्चीत करण्यात आली.
Shankar Jagtap
Shankar Jagtapsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : आगामी महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीत काल (ता.२५) निश्चीत करण्यात आली. त्यानुसार पक्ष सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी पुण्यातील आमदार माधूरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्याकडे सोपविण्यात आली. तर, शहरातील तीनपैकी चिंचवड या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (ता.२६) केली. ते चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे बंधू आहेत. आगामी पालिका निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.

Shankar Jagtap
`Nawab Malik यांना कोणत्याही स्थितीत तुरुंगात टाकायचे होते..`

चिंचवडच्या सहाय्यकपदी या मतदारसंघाचे भाजप प्रभारी संतोष कलाटे यांची निवड करण्यात आली. ते जगताप यांचे विश्वासू आणि निकटचे सहकारी आहेत. शंकर जगतापांकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. त्यांनी २०१७ ची महापालिका निवडणूक तसेच २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि पक्षाची ध्येयधोरणे पोहचवण्याचे काम केले आहे. जमिनीवर राहून पक्ष कार्यकर्त्यांना ताकद देणे, पक्षाचे काम पोहोचवणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळवून देणे तसेच आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्याचे काम त्यांनी मतदारसंघात केले आहे.

Shankar Jagtap
PM मोदींचा पुणे दौरा : अजितदादांचं तर ठरलं, ठाकरेंच अद्याप फिक्स नाही

त्याची दखल घेऊन भाजपने आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी पिंपरी पालिका निवडणुकीत आपल्या संघटन कौशल्याने भाजपला मोठे यश मिळवून द्याल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी जगताप यांच्या नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी आपल्या निवडीवर दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात शहरात झालेल्या विकासकामांच्या जोरावर पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी, माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीतही पुन्हा शत प्रतिशत भाजपचीच सत्ता आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com