`Nawab Malik यांना कोणत्याही स्थितीत तुरुंगात टाकायचे होते..`

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची परिवार संवाद यांत्रा शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आली आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने (BJP) लावून धरली आहे. पण, कुठल्यातरी राज्याच्या निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून त्यांच्याविरुद्ध ओढूनताणून ही केस करण्यात आली आहे. तिला टेरर फंडिंगचा अॅंगल देऊन. बदनाम करण्यचे षडयंत्र रचले गेलेआहे. तसेच त्यांच्यावर लावलेले आरोपांची अद्याप पुष्टी होणेही बाकीआहे. त्यामुळे मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) शनिवारी (ता.२६) स्पष्ट केले. त्यांची परिवार संवाद यात्रा शनिवारी शहरात आली. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वीस वर्षापूर्वीच्या जुन्या प्रकरणात मलिक यांना स्पष्टीकरणासाठी वीस मिनिटेही देण्यात आली नाहीत. त्यावरून त्यांना कशाहीप्रकारे कायदा डावलून तुरुंगात टाकायचेच होते. असा निश्चय केलेल्यांचे हे कृत्य आहे, अशा शब्दांत पाटील यांनी भाजप व त्यांच्या केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला. मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने नुकतीच (ता.२३) राज्यभर निदर्शने केली. पिंपरीतील या निर्दशनात शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी मलिकांचा गुन्हा एवढा गंभीर आहे की त्यांना अटक नाही, तर जाहीर चौकात फाशी दिली पाहिजे, असे आक्रमक वक्तव्य केले होते.

Jayant Patil
माधुरी मिसाळांकडे जबाबदारी : महेश लांडगे अन् लक्ष्मण जगतापांचे पंख छाटले

त्यावर अशा पद्धतीची वक्तव्ये करणे विधानसभा सदस्याला शोभत नाही, अशी संयमी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर वारेमाप आरोप केल्याशिवाय लोक लक्ष देत नाहीत. तसेच मोठ्या माणसांची नावे घेतल्याशिवाय बातम्याही येत नाहीत. म्हणून भाजपच्या किरीट सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या चौकशीचे संकेतही पाटील यांनी यावेळी दिले. या पालिकेत खूप फसवाफसवी झाली आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे घडलीत. त्यातील काही पुढे येतील, असे सांगत त्यांनी जणू काही त्याप्रकरणी चौकशीचेच संकेत दिले. पण, मुद्दाम अॅक्शन होणार नाही, असे सांगत चूक झाली असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर चौकशी अभिप्रेतच आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षण प्रश्न हा बराचसा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे.

Jayant Patil
शहराचा कोपरा न कोपरा अजित पवारांना माहिती; लोक पुन्हा सत्ता देतील!

त्यामुळे त्यांच्याकडे भूमिका मांडण्याची गरज आहे. म्हणून खासदार संभाजीराजे यांना आंदोलन करू नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आगामी निवडणुकीत आमचे प्राधान्य सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र करण्याचा आग्रह आहे. पण, अवास्तव जागा मागितल्या की अडचण होते, असे ते म्हणाले. परंतू, त्याला वेळ आहे, असेही लगेच त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com