'सोमय्यांवरचा हल्ला महागात पडणार; केंद्राचा सिक्युरिटी इनचार्ज पुण्यात दाखल'

केंद्रातील सुरक्षा प्रमुखांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना (Pune CP) त्याची वेगळी तक्रार दाखल करायला सांगितली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला हल्ला भाजप (BJP) सहजासहजी खपवून घेणार नाही. आम्ही यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. सोमय्यांवर झेड दर्जाची सुरक्षा असतानाही हल्ला झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुख हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. परिणामी सोमय्या यांच्या हल्ल्याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील,असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. ते आज (ता.10 फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Chandrakant Patil
'रूपालीताईंच्या घरी जाऊन मी विचारणार आहे की, महिलांना वाईन चालेल का?'

पाटील म्हणाले, सोमय्या यांच्यावर हल्ला करणे महागात पडणार आहे. याप्रकरणी केंद्राच्या सुरक्षा प्रमुखांनी पुणे पोलीस आयुक्तांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणात पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणाला भाजप सहजासहजी खपवून घेणार नाही. सुट्टीचा दिवस असूनही पालिकेच्या आत १०० लोक कसे घुसले होते? तसेच, केंद्रीय पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांवर दबाव असल्यासारखी त्यांनी कलमे लावली आहे. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुखांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना त्याची वेगळी तक्रार दाखल करायला सांगितली आहे. अन्यथा केंद्रातील सुरक्षाप्रमुख न्यायालयात जातील, असे पाटील यांनी सांगितले आहे.

पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या २७ महिन्यांत नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होण्यापासून शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेपर्यंत अनेक प्रकरणे घडली. मात्र, त्यांनी दाद मागण्यासाठी न्यायालयाचा पर्याच निवडला होता. आता पहिल्यांदाच आरोप सहनच नाही झाले म्हणून सोमय्यांवर हल्ला करण्यात आला आहे. राऊतांना जर केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस व सोमय्या हे केंद्रीय यंत्रणांचा उपयोग करतात असे वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्लाही पाटीलांनी दिला आहे.

Chandrakant Patil
औरंगाबादेतील राष्ट्रवादीचा भोपळा अजितदादांना सलतोय...तो फोडण्यासाठी काॅंग्रेसचा नेता फोडला!

दरम्यान, पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत रूपाली चाकणकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रिच्या धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. तसेच, नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कॅाग्रेसने परराज्यातील नागरिकांना दिलेल्या टीकेवरून मोदी यांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या टीकेवरून कॅाग्रेसला लक्ष्य केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com