औरंगाबादेतील राष्ट्रवादीचा भोपळा अजितदादांना सलतोय...तो फोडण्यासाठी काॅंग्रेसचा नेता फोडला!

औरंगाबादमधून राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडून न आल्याने अजित पवारांनी व्यक्त केली खंत
Sanjay Jadhav Join NCP
Sanjay Jadhav Join NCPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आम्ही आघाडीत असलो तरी प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची मुभा आहे. औरंगाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. औरंगाबादमध्ये विधानसभेच्या नऊ जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एकही आमदार निवडून आला नाही, ही आमची खंत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतो. मात्र, विधानसभेला एकही सदस्य निवडून येत नाही, याबाबत विचार करण्याची गरज आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar lamented that not a single NCP MLA was elected from Aurangabad)

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव आणि पक्षाच्या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे माजी संचालकांनी गुरुवारी (ता. १० फेब्रुवारी) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

Sanjay Jadhav Join NCP
पाटणच्या जनतेसाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार 'जनता दरबार'

अजित पवार म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरचे माजी नगराध्यक्ष जाधव यांच्या प्रवेशाबाबत मला सांगितले होते. मी आमदार चव्हाण यांना शब्द दिला होता की संजय जाधव यांच्या प्रवेशाच्या वेळी मी नक्की उपस्थित राहीन, त्यानुसार मी आज तुमच्यासमोर उभा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरात एक शुभकार्य असल्यामुळे ते जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.

Sanjay Jadhav Join NCP
दोन वेळा तुरुंगात जाऊन आलात, आता तरी सुधरा! केसरकरांचा राणेंना शहाणपणाचा सल्ला

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. इतर पक्षांमधील लोक राष्ट्रवादीत येऊ पाहतात, त्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार ते प्रवेश होतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Sanjay Jadhav Join NCP
वाद घालणं विरोधी पक्ष नेत्याला पडलं महागात : नाना पटोलेंनी दिला दणका

पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही भेदभाव नाही. ज्यांच्यामध्ये क्षमता, नेतृत्व आहे, त्यांना संधी दिली जाते. अगदी गरीब घरातून जन्माला आलेल्या व्यक्तींना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. (स्व.) आर. आर. पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपदार्यंत काम करण्याची संधी पक्षानेच उपलब्ध करून दिली आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत.

संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर-खुलताबादचा विकास होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्यापुढे अनेक संकटे येतील. पण, त्यातून खचून जायचे नसते. त्या संकटातून पुढे जात असताना आपल्याला सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राष्ट्रवादीला प्रथम स्थानावर आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com