Chandrakant Patil Kasba By-Election
Chandrakant Patil Kasba By-ElectionSarkarnama

Kasba By-Election : चंद्रकांतदादांनी कसब्याची निवडणूक लईच मनावर घेतली; कोथरुडमधून मुक्कामच हलवला

Pune By-Election : चंद्रकांतदादांनी कसबा पेठेतील सुभाषनगरमध्ये फ्लॅटच भाड्याने घेतला

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Chinchwad and Kasba By-Election : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते तळ ठोकून आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तर वेळ वाचवण्यासाठी कसबा मतदारसंघातच फ्लॅट भाड्याने घेतल्याची चर्चा आहे.

एवढंच नाही तर काँग्रेसने यावेळी भाजपला धोबीपछाड द्यायचाच, असा चंगच बांधला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वत: पुण्यात तळ ठोकला आहे. तसेत राष्ट्रवादीचे अजित पवार हे देखील तळ ठोकून आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि आघाडीने कंबर कसली आहे.

Chandrakant Patil Kasba By-Election
Kasba By-Election : धंगेकरांनी घेतली दाभेकरांची भेट : काँग्रेस एकजुटीने लढणार?

या दोन्ही मतदारसंघात सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी तर चिंचवडमध्ये सभा देखील घेतल्या आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक-दोन वेळा येऊन गेले आहेत.

Chandrakant Patil Kasba By-Election
Kasba by-election : कसबा कधीच भाजपचा नव्हता; नाना पटोलेंनी सांगितले विजयाचे गणित

तसेच भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कसबा जिंकून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

पाटील यांनी या निवडणुकीच्या दरम्यान जास्त वेळ कसब्यात देता यावा, जास्तीत जास्त लोकांना भेटता यावं, कार्यकर्त्यांना वेळ देता यावा, यासाठी त्यांनी कसबा पेठेतील सुभाषनगरमध्ये फ्लॅटच भाड्याने घेतला आहे.

मात्र, येथे ते या निवडणुका होईपर्यंतच राहणार असून ते पुन्हा कोथरूडला जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी चंद्रकांत पाटील यांचा तात्पुरता मुक्काम कसब्यात असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com