Kasba by-election : कसबा कधीच भाजपचा नव्हता; नाना पटोलेंनी सांगितले विजयाचे गणित

Nana Patole News : कसबा पोटनिवणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे.
Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Kasba by-election News : कसबा पोटनिवणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसने यावेळी भाजपला धोबीपछाड द्यायचाच, असा चंगच बांधला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वता: पुण्यात तळ ठोकला आहे. (Congress state president Nana Patole said regarding the Kasba by-election)

कबसा पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले की ''कसबा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) कधीच नव्हता. भाजपने तसे परसेप्सन निर्माण केले आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही भाजपला दाखवून देऊन मतदारसंघ कोणाचा आहे. गिरीष बापट येथून पाच वेळा आमदार असले तरी हा मतदारसंघ काँग्रेसचाच (Congress) होता, असा दावा पटोले यांनी यावेळी केला.

Nana Patole News
Uddhav Thackeray News : हिम्मत असेल तर आज निवडणुका घ्या, आम्ही तयार...; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

महागाई, बेरोजगारी, जिएसटी हे मुद्दे भाजपच्या विरोधात आहेत. आम्ही ते मुद्दे प्रचारामध्ये लावून धरणार आहेत. काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदारी दिली आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची समिती आम्ही स्थापन केली आहे. त्या माध्यमातून कसब्यामध्ये तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून व्यवस्थीत प्रचार सुरु आहे.

भाजपला जनता घरी बसवेल, तसेच त्यांनी यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले, पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की काहीही करून आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. मात्र, मतदारांनी ठरवले आहे. ते भाजपला उत्तर देतील. या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. त्यावर भाजपने काम केलेले नाही, ते प्रश्न घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचणार आहोत, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole News
Kasba By-Election : धंगेकरांनी घेतली दाभेकरांची भेट : काँग्रेस एकजुटीने लढणार?

कसबा मतदार संघाचा आम्ही पूर्ण अभ्यास केला आहे. यावेळी आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत. आम्ही पूर्ण तयारीनीशी निवडणुकीला सामोरे जात आहोत. सर्व कार्यकर्त्यांना मी निवडणुकीत सक्रीय केले आहे. ही निवडणूक जिंकून आम्हाला पुढील निवडणुकांची तयारी करायची आहे, असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com